Mahatma Phule Protsahan Anudan : एकाच वर्षात दोनवेळा पीक कर्ज उचलणाऱ्यां शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

Pik Karj Scheme : कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mahatma Phule Protsahan Anudan
Mahatma Phule Protsahan Anudanagrowon

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील १४, ८०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटीची मिळणारी ही रक्कम ७५ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्य सरकारने २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांचा कालावधी विचारात घेण्यास मान्यता दिली होती. या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्जउचल करून नियमितपणे परतफेड केलेले शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरणार होते.

मात्र, ज्या शेतकऱ्यांनी या तीनपैकी एकच वर्ष कर्जउचल करून परतफेड केलेली आहे, ते या लाभापासून वंचित राहत होते. जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची त्यामध्ये मोठी संख्या आहे.

गेल्या वर्षी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करून तो शासनास पाठवण्यात आला होता. शासन निर्णयातील जाचक निकषांमध्ये शिथिलता आणल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य मिळाल्याचेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Mahatma Phule Protsahan Anudan
Mahatma Phule Karj Yojana : एकाच वर्षात दोनदा कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांचा मिळणार लाभ

आमदार आबिटकरांकडून सातत्याने पाठपुरावा

कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विषय प्रलंबित होता. या शेतकऱ्यांनाही प्रत्येकी ५० हजार रूपये देण्याचे ठरले, पण एकाच वर्षात दोनवेळा कर्ज घेतलेल्यांना यातून वगळण्यात आले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी याही शेतकऱ्यांसाठी पहिल्यापासून पाठपुरावा केला.

जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधकांकडून माहिती घेत त्यांनी थेट सहकार आयुक्त, सहकारमंत्र्यांपर्यंत हा विषय नेला. सहकार आयुक्तांनी हे प्रकरण नाकारल्यानंतर आबिटकर यांनी याप्रश्नी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय नेला. त्यांनी जिल्ह्यासाठी स्वतंत्र आदेश काढून सुमारे १४ हजार ८०० शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com