Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : ‘चासकमान’मधून पाणी सोडून पाणीटंचाई दूर करा

Water Scarcity : चासकमानचे पाणी वेळ नदीत सोडून तळेगाव ढमढेरे येथील बंधारे त्वरित भरावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी पत्राद्वारे आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Shirur News : परिसरात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, चासकमानचे पाणी वेळ नदीत सोडून तळेगाव ढमढेरे परिसरातील सर्व बंधारे पाण्याने भरून तात्पुरती पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

चासकमानचे पाणी वेळ नदीत सोडून तळेगाव ढमढेरे येथील बंधारे त्वरित भरावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी पत्राद्वारे आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन शिक्रापूर येथील चासकमान कार्यालयात देण्यात आले आहे. या वेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटभाऊ भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, बाजार समितीचे माजी संचालक ॲड. सुदीप गुंदेचा, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे व राकेश भुजबळ आदी उपस्थित होते.

दरम्यान, नागरिकांच्या मागणीनुसार चासकमानचे पाणी वेळ नदीत सोडण्यात येईल, असे आश्वासन चासकमानच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

दरम्यान, चालू वर्षी शिरूर तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, चासकमानच्या पाण्याचे योग्य नियोजन करून सर्वांनाच पाणी मिळावे अशी अपेक्षा आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली.

चासकमानच्या पाण्यासाठी आगामी काळातही योग्य पाठपुरावा करून सर्वांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT