Water Crisis : मराठवाड्यात वाढते आहे पाणीटंचाईची धग

Water Shortage : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर आला असून, ४९ लघू व २ मध्यम प्रकल्प मिळून ५१ प्रकल्प कोरडे पडले आहेत.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील पाणी साठ्यांची पातळी पाणीटंचाईची धग वाढत असल्याची स्थिती दर्शविते आहे. मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर आला असून, ४९ लघू व २ मध्यम प्रकल्प मिळून ५१ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

यंदा संपूर्ण पावसाळ्यात मराठवाड्यात पावसाच प्रमाण कमी राहिले. पावसाचे जवळपास तीन ते सहापर्यंत प्रदीर्घ खंड प्रत्येक जिल्ह्यात अनुभवले गेले. या खंडामुळे खरिपातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालं. परतीचा पाऊस येईल अशी आशा होती ती सुद्धा फोल ठरली. त्यामुळे पीक गेली सोबत पाणीसाठेही भरले नाही.

Water Shortage
Water Crisis Management : डिसेंबरअखेर सव्वाचार कोटींचा टंचाई आराखडा

अशाही स्थितीत उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात रब्बीची पेरणी केली. तिला अवेळी आलेल्या पावसाने मोठा दणका दिला. अनेक भागांत पडलेल्या पावसामुळे वरच्या भागात पाणी दिसत असले, तरी प्रकल्पातील पाणीसाठे यंदा मराठवाड्यात दुष्काळाची झळ अधिक तीव्र राहण्याची शक्यता दर्शवीत आहेत.

मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांपैकी नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील तीन प्रकल्पांतच ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. बीड व धाराशिवमधील प्रत्येकी २, तसेच परभणीतील १ मिळून ५ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, तर नांदेड व परभणीमधील प्रत्येकी एका प्रकल्पात ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Shortage
Water Storage : नांदेडला १०४ प्रकल्पांत ६७ टक्के पाणीसाठा

मध्यम ७५ प्रकल्पांपैकी बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एक प्रकल्प कोरडा पडला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांतील २२ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. तर २२ मध्यम प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. १३ मध्यम प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा शिल्लक असून, ५ मध्यम प्रकल्पात ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान, तर ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.

७५० लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील ९, बीडमधील १४, लातूरमधील ४, तर धाराशिवमधील सर्वाधिक २२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील २७, जालन्यातील ४१, बीडमधील ५३, लातूरमधील ४२, धाराशिवमधील ९७, नांदेडमधील एक तर परभणीतील ७ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

१८६ लघू प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ५६ लघू प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ५८ लघू प्रकल्पात ५० ते ७५ टक्के दरम्यान, तर १३३ लघू प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com