PM Kusum Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपासाठी नऊ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या संकेतस्थळाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

Team Agrowon

Satara News : मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या संकेतस्थळाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील नऊ हजार ४४५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन हजार ३४७ शेतकऱ्यांनीच पंपासाठीचा लाभार्थी हिस्सा भरला आहे, तर प्रत्यक्षात ४१४ शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसले आहेत.

शेतकऱ्यांना संपूर्ण दिवस वीज उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेती पिकांना पाणी देणे अडचणीचे होत होते. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत होते. शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळावी, म्हणून महावितरणने मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरू केली.

सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या या योजनेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी महावितरणने संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत नऊ हजार ४४५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, तर दोन हजार ३४७ शेतकऱ्यांनीच पंपासाठीचा लाभार्थी हिस्सा भरला आहे आणि प्रत्यक्ष ४१४ शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसविले आहेत.

सौर कृषिपंप योजनेस जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. उर्वरित शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचे काम सुरू आहे. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे सौर पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून दिला जातो.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही केंद्र व राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळते. कंपनी निवडणे शेतकऱ्यांवर अवलंबून आहे.

ऑनलाइन यादी काही कंपन्यांकडे जात असल्याने शेतकऱ्यांना समजण्याअहगोदर कंपन्यांना समजत आहे. या कंपन्यांना शेतकऱ्यांना संपर्क करून आमच्या कंपनीची सोलर घेण्याचे सुचवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकरता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

नोंदणी करण्यासाठी...

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.phpया संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्या आधारे शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर पुढील प्रगतीची माहिती या संकेतस्थळावर तपासता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT