Solar Agriculture Pump : ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेचा अर्ज पोर्टल स्वीकारेना

Solar Scheme : शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला यापुढे नव्याने वीजपुरवठा देण्याऐवजी सौरपंप देण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
Mahavitaran Scheme
Mahavitaran SchemeAgrowon
Published on
Updated on

Akola News : शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला यापुढे नव्याने वीजपुरवठा देण्याऐवजी सौरपंप देण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. दुसरीकडे या सौरपंपाच्या जोडणीचा अर्ज साइटवर अपलोड होत नसल्याने शेतकऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. साइटवर काही दिवसांपासून अर्ज स्वीकारले जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शासनाकडून सौरपंपासाठी महावितरणमार्फत ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना राबवली जात आहे. यासाठी ज्या वेबसाइटवर अर्ज घेतले जातात, ती साइट काम करीत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. या साइटवर शेतकऱ्यांना सातत्याने तांत्रिक ‘एरर’ (अडचण) असल्याचा मेसेज मिळत राहतो.

Mahavitaran Scheme
Solar Pump Scheme : महावितरणने ओलांडला सौर कृषिपंपांचा ५० हजारांचा टप्पा

सुविधा केंद्र चालकही यामुळे त्रासले आहेत. शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करताना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने काही केंद्रचालक मध्यरात्रीपर्यंत या साइटवर नजर ठेवून थांबत आहेत.

Mahavitaran Scheme
Solar Pump Scheme : नाशिक जिल्ह्यात ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेला प्रतिसाद

त्यामुळे हा अर्ज दाखल करण्यासाठी ते अधिक मोबदला मागत आहेत. काही ठिकाणी हजार रुपयांपर्यंत पैसे मागितले जात आहेत. यापूर्वी कुसुम योजना, महाडीबीडीटीवर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या अर्जांची पूर्तता झालेली नसताना आता नवीन प्रक्रियेद्वारे अर्ज घेतले जात आहेत. त्यामुळेही शेतकरी त्रस्त होऊ लागले आहेत.

अर्ज दाखल करताना अनेक अडचणी येतात. महावितरणने शेतकऱ्यांना आता नवीन वीजजोडणी देणे बंद केले आहे. सर्वांनी या वेबसाइटवरून सौरपंपासाठी अर्ज करावेत, असा सल्ला महावितरणचे अधिकारी देतात. परंतु ही वेबसाइट चालत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होत आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाने एक प्रकारचा खेळ सुरू केला आहे. नवीन योजना काढायची आणि तिच्याभोवती शेतकरी फिरवत ठेवायचे, असा उद्देश दिसून येतो.
विनोद पाटील, शेतकरी, सुदी, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com