Refrigeration Process Agrowon
ॲग्रो विशेष

Meat Refrigeration Process : मांस टिकविण्यासाठी शीतकरण प्रक्रिया गरजेचीच!

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : दोन तासांपेक्षा अधिक काळ कापून ठेवलेल्या मांसावर नैसर्गिक नियमाप्रमाणे जिवाणू सक्रिय होतात. त्यानंतर हे मांस खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मांस दोन ते अडीच तासांपेक्षा अधिक काळ कापून ठेवलेले असल्यास ते खाण्यायोग्य राहत नसल्याचा धक्‍कादायक दावा हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी केला आहे. आपल्याकडील उघड्यावर लटकवून मांस विकण्याच्या पद्धतीऐवजी कापल्यानंतर मांस टिकविण्यासाठी आठ ते दहा तासाची शीतकरण प्रक्रिया गरजेचीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (ता. ४) रोजी नागपूर दौऱ्यावर असलेल्या डॉ. बारबुद्धे यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, जंगलातील बहुतांश प्राणीही शिकारीनंतर तत्काळ ताजे मांस खाण्यावरच भर देतात. प्राणी मेल्यानंतर काही काळ लोटल्यास त्यात जीवाणू सक्रिय होऊन मांस खराब होण्यास सुरुवात होते.

मांसासाठी शेळी-मेंढी कापल्यानंतर ग्राहकांना दिसेल अशा प्रकारे उघडी लटकवली जाते. सकाळी लवकर कापलेल्या या प्राण्याचे मांस अनेक वेळा संध्याकाळपर्यंत दीर्घकाळ उघड्यावर राहते. खरे तर दोन ते अडीच तासापर्यंत ताज्या मांसांचे सेवन करणे गरजेचे असते. त्यापेक्षा अधिक काळ राहिलेल्या मांसाची लवचिकता कमी होते, तसेच ते मांस खराब होऊन खाण्यायोग्य राहत नाही. हे टाळण्यासाठीच मांस कापल्याबरोबर ते कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्याची शिफारस केली आहे.

प्राण्याची कत्तल केल्यानंतर त्यांचे स्नायूचे मांसामध्ये (मसल टू मीट) रूपांतर होण्यासाठी कापल्याबरोबर आठ ते दहा तास फ्रीजमध्ये ठेवावे. या शीतकरणाच्या प्रक्रियेमुळे त्यातील शर्करेचे (ग्लायकोजेन) रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होते. त्यामुळे मांसाचा कुरकुरीतपणा आणि टिकवणक्षमता वाढते. त्यातील पौष्टिक घटक टिकून राहून, ते खाण्यासही चवदार लागते. जगातील अनेक देशांमध्ये मांसासाठी ही पद्धत वापरली जाते. भारतात मात्र आरोग्याशी निगडीत या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
डॉ. एस. बी. बारबुद्धे, (संचालक, मांस संशोधन केंद्र, हैदराबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

SCROLL FOR NEXT