Manmad APMC
Manmad APMCAgrowon

Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या हालचाली

Agriculture Market Committee : अविश्‍वास ठराव अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आणि जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्याकडे सादर केला.
Published on

Nashik News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतराची शक्यता निर्माण झाली असून, विद्यमान भाजपचे सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात १२ संचालकांनी अविश्‍वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे.

अविश्‍वास ठराव अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आणि जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्याकडे सादर केला.

विरोधी आघाडीचे माजी आमदार व विद्यमान संचालक संजय पवार, किशोर लहाने यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १२ संचालक उपस्थित होते. बाजार समितीचे सत्ता समीकरण झपाट्याने बदलत आहेत. रमेश कराड यांची संचालकपदी नुकतीच झालेली निवड ही महत्त्वाची ठरू शकते.या अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी लवकरच बैठक बोलावण्याची तारीख जाहीर करणार आहेत.

ठराव मंजूर झाल्यास भाजप नेतृत्वाखालील सत्तेला झटका बसेल. शिवसेना आमदार सुहास कांदे गटाच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीमध्ये अंतर्गत वाद, कायदेशीर व बेकायदेशीर बैठका, तसेच राजकीय कुरघोडी यांमुळे वातावरण तापलेले आहे.

Manmad APMC
Manmad APMC : मनमाड बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा ‘लिलाव बंद’ मागे

यातील काही प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि पणन संचालकांपुढे सुरू आहे. १२ संचालक विरोधी गटाकडे असल्यामुळे सभापतींकडे बहुमत राहिले नाही. त्यामुळे अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी बैठक घेणार आहेत. दोन-तृतीयांश बहुमताच्या आधारावर सादर केलेला ठराव जर मंजूर झाला, तर गोगड यांचे पद जाणे निश्‍चित मानले जात आहे.

Manmad APMC
Manmad APMC : पगाराअभावी आमच्यावर उपासमारीची वेळ

विद्यमान सभापती दीपक गोगड, काही सदस्य सुरुवातीला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या गटात होते. मात्र नंतर सभापती गोगड, संचालक आणि माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पण त्यांच्याच गटातील काही संचालकांनी त्यांच्याविरोधात सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि शिवसेना (कांदे गट) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाचे चित्र दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com