Summer Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : यंदा पाणी टंचाईचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसल्याचे दिसून येते. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी २५ हजार ७ हेक्टर म्हणजेच ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी पेरणीच्या क्षेत्रात जवळपास ९ हजार ७३३ हेक्टरने घट झाली आहे. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश असून पाण्याअभावी पिके सुकत आहेत.

गेल्या वर्षी सरासरी क्षेत्राच्या ३४ हजार ७४० हेक्टर म्हणजेच १२६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. परंतु पाणी टंचाईची झळही काही ठिकाणी बसली आहे. पाण्यासह चाराटंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांकडे वळू लागले आहेत. परिणामी विभागात उन्हाळी पिके कमी होत आहेत. विभागातील काही तालुक्यांत आता पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.

नगरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारीची ९० टक्के क्षेत्रावरील, गव्हाची ८५ टक्के क्षेत्रावरील, मक्याची ५५ ते ६० टक्के क्षेत्रावरील, हरभऱ्याची ९५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी मक्याची ३१०३ हेक्टर, बाजरीची ४००५ हेक्टर, भुईमुगाची २६८२ हेक्टर, तर सोयाबीनची १२१ हेक्टरवर पेरणी झाली असून पिके वाढीच्या अवस्थेतील ही पिके पाण्याअभावी पिके सुकली आहेत.

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाची ९५ टक्के, हरभऱ्याची ९८ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी हंगामातील मक्याची ३०३९ हेक्टर, बाजरीची ३८२०, तर भुईमुगाची २०९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सोलापूरमध्ये मका, गहू व हरभरा पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळी हंगामातील मक्याची ४२०४ हेक्टर, भुईमुगाची १४४८ हेक्टर तर बाजरीची १७४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय झालेल्या पेरण्या ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा---सरासरी क्षेत्र---पेरणी झालेले क्षेत्र---टक्के

नगर---८८८६---१०,०३७---११३

पुणे ---११०९४---९,११०---८२

सोलापूर---७६४५---५८६०---७७

एकूण---२७,६२५---२५,००७---९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT