Pune News: राज्यातील साखर कारखान्यांची यांत्रिक कामे येत्या दशकात बहुतांश कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे साखर, सहवीज तसेच उपपदार्थ निर्मितीमधील दोष शोधून त्यावरील उपायदेखील ‘एआय’ सांगू लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. .यांत्रिक कामे एआयवर आणण्याबाबत दौंड शुगर, अंबालिका शुगर, क्रांती शुगर या कारखान्यांमध्ये प्रयोग सुरू झाले असून त्यांचे निष्कर्ष उभारी देणारे आहेत. साखर कारखान्यांच्या यांत्रिक कामात एआय आणण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पाच वर्षांपासून चाचण्या घेत आहे..Sugar Industry Crisis: कपात, काटामारी अन् कारखाने.या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आल्याने आता दोन तज्ज्ञांचा स्वतंत्र कक्ष चालू करण्यात आला आहे. कारखान्यांना एआय जाणणारे प्रगत मनुष्यबळ देण्यासाठी ‘मेकॅट्रॉनिक्स’ नावाचा स्वतंत्र अभ्यासक्रमदेखील व्हीएसआय सुरू करते आहे. यात यंत्र अभियांत्रिकी, विद्युत, स्वयंचलन व एआय याचे अद्ययावत ज्ञान एका छत्राखाली मिळणार आहे..राज्यातील साखर कारखान्यांचे स्वयंचलन (ऑटोमेशन) वेगाने होते आहे. परंतु, अद्याप स्वयंचलनाला एआयची जोड मिळालेली नाही. या प्रणालीला एआय जोडल्यास यांत्रिक दोष आधीच कळतील. समस्या उद्भवल्यास त्याची कारणे व उपाय तत्काळ सांगण्याचे काम एआयकडून होईल..Sugar Industry: साखरेचा किमान विक्री दर ४२०० रुपये करा.व्हीएसआयच्या साखर अभियांत्रिकी व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे प्रमुख राजेंद्र चांदगुडे यांनी सांगितले, की कारखान्यात तूर्त काही टप्प्यांवर एआय निश्चित कसा काम करेल, याचा आराखडा तयार झालेला आहे. यंत्राच्या कार्यप्रणालीचे माहिती संकलन (डेटा) करून ते आम्ही क्लाऊडवर अपलोड केले आहे. त्याद्वारे संबंधित यंत्र प्रणाली दूरस्थ पद्धतीने (रिमोट मॉनिटरिंग) आम्ही हाताळू शकतो..आता पुढील टप्पा या प्रणालीच्या हालचालींचे विश्लेषण करून त्याचे तत्काळ संदेश (अलर्ट) एआयने देण्याचा आहे. आम्ही त्याचाच अभ्यास सध्या करीत आहोत. भविष्यात साखर कारखान्यातील प्रमुख व्यक्ती त्याच्या कारखान्यातील कोणते यंत्र, नेमके काय करते आहे हे थेट मोबाइलवर पाहू शकणार आहे..‘एआय’मुळे उत्पादनातील तोटे घटणारयंत्रप्रणालीत एआय आल्यानंतर आज किती कमी ऊस गाळला जातोय, त्याची काय कारणे आहेत, सहवीज निर्मितीमधील अडथळे कोणते, साखर निर्मितीसाठी गंधक किंवा चुना किती वापरावा, याची माहिती देणारे अलर्ट थेट मोबाइलवर मिळू शकतील. यामुळे कारखान्यातील मनुष्यबळाची तांत्रिक निर्णयक्षमता वाढेल, साखरेची गुणवत्ता वाढेल व उत्पादनातील तोटे घटतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.