Summer Crop
Summer CropAgrowon

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Summer Crop : राज्यात अनेक भागात यंदाही दुष्काळी स्थिती असली तरी पाणी उपलब्ध असलेल्या धरणक्षेत्र परिसरात उन्हाळी पिके पेरली गेली आहेत.

Nagar News : राज्यात अनेक भागात यंदाही दुष्काळी स्थिती असली तरी पाणी उपलब्ध असलेल्या धरणक्षेत्र परिसरात उन्हाळी पिके पेरली गेली आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार, यंदा राज्यात गतवर्षीपेक्षा पावणे सात हजार हेक्टरने उन्हाळी क्षेत्र वाढले आहे.

सरासरीपेक्षा सुमारे ३९ हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात साडेचौदा हजार हेक्टरने घट झाली आहे. तीळ, उन्हाळी ज्वारीचे क्षेत्र मात्र वाढले आहे.

राज्यात दरवर्षीच पाणी उपलब्ध असलेल्या भागात उन्हाळी पिकांची पेरणी केली जाते. यंदा बहुतांश भागात टंचाईची स्थिती आहे. मात्र पाणी असलेल्या धरण क्षेत्रासह अन्य भागात उन्हाळी पिके करण्याला प्राधान्य दिले आहे.

Summer Crop
Summer Sowing : उन्हाळी पेरण्यांना टंचाईची झळ

त्यात चारा देण्याऱ्या पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी उन्हाळी सोयाबीनची अधिक पेरणी होत असते, यंदा मात्र गतवर्षीपेक्षा साडेचौदा हजार हेक्टरने घट झाली आहे. यंदा उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवणार असल्याने उन्हाळी ज्वारीचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा १५ हजार हेक्टरने वाढले आहे.

Summer Crop
Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

मराठवाड्यात कमी पेरणी

बाजरी, मूग, उडदाचे क्षेत्र जेमतेम आहे. तिळाच्या क्षेत्रात मात्र यंदा पावणेबारा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा पुणे, नगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, वाशीम, अकोला, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत उन्हाळी पिकांची पेरणी अधिक आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत उन्हाळी पेरणी कमी आहे. उन्हाळी ज्वारी, तिळाचे क्षेत्र वाढून सोयाबीनचे क्षेत्र पहिल्यांदाच कमी झाले आहे.

पीकनिहाय उन्हाळी पेरणी (कंसात गतवर्षीची पेरणी हेक्टरमध्ये)

भात ः १६७७०३ (१६४०८९)

मका ः ५०४८८ (५७९४२)

ज्वारी ः २९४६७ (१४५११)

बाजरी ः ३२४२६ (३३६३०)

इतर तृणधान्य ः १८३४ (१६२५)

मूग ः ९४५८ (९१२२)

उडीद ः ५८२ (४०८)

इतर कडधान्य ः ७९३ (१४३४)

भुईमूग ः ७०३१२ (६५३६९)

सूर्यफूल ः ८३१ (५५०२)

तीळ ः १९६०० (७८५३)

सोयाबीन ः ४८३४ (१९२९६)

इतर गळीतधान्य ः ५०८ (१२८६)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com