Malnutrition  Agrowon
ॲग्रो विशेष

Malnutrition : मेळघाटातील बालमृत्यू, माता मृत्यूमध्ये घट

Child Mortality : गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करून मेळघाटात ‘मेळघाट मिशन २८’ राबविण्यात आले आहे.

Team Agrowon

Amaravati News : कुपोषण आणि बालमृत्यूमुळे सदैव चर्चेत असलेल्या मेळघाटात परिणामकारक आरोग्य सुविधा तसेच जिल्हा प्रशासनाच्या विशेष लक्षामुळे बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या प्रमाणात घट आली आहे, असा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करून मेळघाटात ‘मेळघाट मिशन २८’ राबविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध सुविधा, सात फिरती आरोग्य पथके, सहा प्राथमिक आरोग्य पथके, ९३ उपकेंद्र, २२ भरारी पथकांमार्फत आरोग्यसेवा देण्यात आली.

परिणामस्वरूप २०१३-१४ मध्ये ३३८ असणारे बाल मृत्यूचा दर २०२३-२४ मध्ये १५६ पर्यंत खाली आला आहे. तर दहा वर्षांपूर्वी १४ वर असणारा माता मृत्यूचा दर हा पाचपर्यंत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे उपजत मृत्यू १३४ वरून ७८ वर आणण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

माता मृत्यू आणि बाल मृत्यूमध्ये घट करण्यासाठी मेळघाट क्षेत्रात गरोदर माता, स्तनदा माता, बालकांना स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दर १५ दिवसांनी चक्राकार पद्धतीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र स्तरावर विशेष तपासणी करण्यात येत आहे.

अति जोखमीच्या बालकांची जबाबदारी बालउपचार केंद्र आणि पोषण संवर्धन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोग्यविषयक सेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्याने आरोग्य सुविधा आणि सेवांच्या दर्जात सुधारणा झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ravikant Tupkar: 'ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची लढाई'; रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, पण अन्नत्याग आंदोलनावर ठाम

Women Development Corporation: ‘माविम’मुळे जिल्ह्यातील २१ हजार महिला स्वावलंबी

Youth Inspiration: मोझरीच्या मातीतून घडला ‘लेफ्टनंट’

Women SHGs: महिला समूहांना एक हेक्टर पडीक जमीन देणार : बावनकुळे

Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SCROLL FOR NEXT