Malnutrition : कुपोषणमुक्तीमध्ये मोखाडा अव्वल

Palghar Malnutrition : मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील पोषण आहार केंद्राच्या प्रयत्नामुळे तब्बल ९० टक्के बालकांच्या प्रकृतीत वाढ झाल्याचे पुणे येथील कुटुंब कल्याण, माता बालसंगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. या
Malnutrition
Malnutrition Agrowon

Mokhada News : कुपोषित बालकांच्या संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र चालवण्यात येतात. या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील कुपोषित बालकांचे आहार, आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील पोषण आहार केंद्राच्या प्रयत्नामुळे तब्बल ९० टक्के बालकांच्या प्रकृतीत वाढ झाल्याचे पुणे येथील कुटुंब कल्याण, माता बालसंगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे.

या केंद्राने उद्दिष्ट पूर्ण करत ११२.८ टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल आला आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी आणि कुपोषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जातात.

Malnutrition
Malnutrition Issue : ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना कुपोषणमुक्तीसाठी धडे

त्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र ही योजना वरदान ठरत आहे. या योजनेत अति तीव्र कुपोषित बालकाला केंद्रात १४ दिवस उपचार केले जातात. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तसेच उर्वरित अति तीव्र कुपोषित बालकांचे आरोग्य सर्वसाधारण होण्यासाठी दोन महिने विविध उपचार केले जातात.

राज्यात ४६ ठिकाणी पोषण पुनर्वसन केंद्रे सुरू आहेत. त्यावर नागपूरमधील पोषाहार विभागाच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्याकडून दरमहा नियंत्रण ठेवले जाते. अतिदुर्गम भागात तीव्र कुपोषित बालकांचे सर्व्हेक्षण करून त्यांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे, किमान १४ दिवस त्यांच्यावर उपचार, तसेच विविध बाबींवर लक्ष दिले आहे.

Malnutrition
Malnutrition Issue : संपामुळे कुपोषणाचा प्रश्न गंभीर

रुग्णालय प्रशासनाकडून उपचार

वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले, वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा रुग्णालयातील पोषण केंद्रातील दाखल आणि फेरतपासणी करण्यात येते. कुपोषित बालकांची घरी काळजी कशी घ्यावी, आहार कसा आणि कोणता असावा, स्थानिक पातळीवरील धान्यापासून विविध आहार कसा बनवावा, याविषयी प्रबोधन करण्यात आले. कुपोषित बालके सर्वसाधारण श्रेणीत आल्यानंतरही, फेरतपासणीचे उपक्रम राबवले आहेत.

रुग्णालय प्रशासनाकडून उपचार

वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले, वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा रुग्णालयातील पोषण केंद्रातील दाखल आणि फेरतपासणी करण्यात येते. कुपोषित बालकांची घरी काळजी कशी घ्यावी, आहार कसा आणि कोणता असावा, स्थानिक पातळीवरील धान्यापासून विविध आहार कसा बनवावा, याविषयी प्रबोधन करण्यात आले. कुपोषित बालके सर्वसाधारण श्रेणीत आल्यानंतरही, फेरतपासणीचे उपक्रम राबवले आहेत.

मोखाडा एकात्मिक बालविकास प्रकल्प, आशा कार्यकर्त्या, तसेच विविध स्वयंसेवी संस्था, केंद्रातील आहार प्रमुख, परिचारिका, सफाई कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे कुपोषम मुक्ती शक्य झाली आहे.
- डॉ. दत्तात्रेय शिंदे, केंद्र प्रमुख, बालरोग तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com