Farmers Welfare Demands: विनाअट, विनाशर्त सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर न्याय मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज गुरुवारी (दि. १८ जून) चौथा दिवस आहे. पण अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. तुपकर यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असे असतानाही तुपकर त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. .सरकारची कर्जमाफी योजना नाही तर वन टाईम सेंटलमेंट योजना आहे. ही योजना फसवी असल्याचा त्यांचा आरोप आहे. आज माझ्या प्रकृतीपेक्षा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची अवस्था अधिक चिंताजनक आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि न्याय मिळावा, यासाठी मी संघर्ष सुरु ठेवला असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे..Ravikant Tupkar Protest: तुपकरांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; आंदोलन चिघळले! अडोळीत दुचाकी पेटवली.''माझी प्रकृती खालावत असली तरी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची ही लढाई मी मागे घेणार नाही. सरकारने आता तरी संवेदनशीलता दाखवून तातडीने निर्णय घ्यावा. हा संघर्ष माझा वैयक्तिक नाही. तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहील,'' असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. .Loan Waiver Protest: शेतकरी संघटनेकडून फसव्या कर्जमुक्तीची होळी .दरम्यान, त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ लातूर येथील शेतकरी सागर चालवड यांनी मुंबईतील मंत्रालय परिसरात उंच झाडावर चढून सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी फटाके फोडले आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्याची मागणी त्यांनी केली..तसेच त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड-मुखेड महामार्गावरील हळदा येथे शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून उफाळून येणारा हा संताप सरकारने वेळीच ओळखला पाहिजे. शेतकरी आता गप्प बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत संघर्ष अधिक तीव्र होत राहील, असा इशारा तुपकर यांनी दिला. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.