Malnutrition : कर्जतमध्ये कुपोषणात वाढ

Malnutrition Update : कर्जत तालुक्‍यात कुपोषणाचे प्रमाण वाढले असून सद्यःस्थितीत २०१ बालकांची नोंद झाली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
Malnutrition
MalnutritionAgrowon

Neral News : कर्जत तालुक्‍यात कुपोषणाचे प्रमाण वाढले असून सद्यःस्थितीत २०१ बालकांची नोंद झाली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. २०२३ वर्षाच्या सुरुवातीला ही संख्या १४६ होती. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे कुपोषित बालकांपर्यंत पोषक आहार न पोहोचल्‍याने ही संख्या वाढल्‍याचे बोलले जात असले तरी याबाबत माहिती देण्यात प्रशासन टाळाटाळ करीत आहेत.

तालुका हा आदिवासी बहुल आहे. शिक्षणाचा अभाव, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्‍या या समाजात कमी वयात लग्‍न करण्याची प्रथा आहे. त्‍यामुळे बालमाता, वेळेआधीच प्रसूती, नवजात शिशूची योग्य काळजी घेण्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्‍याने कुपोषणाचा सामना करावा लागतो.

Malnutrition
Malnutrition : कुपोषणमुक्तीमध्ये मोखाडा अव्वल

जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाचे एकात्मिक बालविकासचे दोन प्रकल्प तालुक्यात सुरू असून त्‍याअंतर्गत एकूण ३३१ अंगणवाड्यांचा समावेश आहे. जानेवारी २०२४ अखेर लहान ० ते ६ वयोगटातील १५ हजार ८७५ बालकांचे सर्वेक्षण झाले. यात १७१ बालके माध्यम तर ३० बालके तीव्र कुपोषित आढळली.

तालुक्‍यातील कुपोषणाचे प्रमाण वाढण्यामागे अंगणवाडी सेविकांचा महिनाभर सुरू असलेला संप हे प्रमुख कारण मानले जात आहे. संपामुळे अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांना शिजवून दिला जाणारा ताजे अन्न मिळालेच नाही. त्याचबरोबर स्तनदा माता, गर्भवतींना दिल्या जाणाऱ्या सुक्या आहाराच्या पाकिटांचेही वाटप वेळेवर झाले नाही.

Malnutrition
Malnutrition Issue : संपामुळे कुपोषणाचा प्रश्न गंभीर

दर महिन्याला बालकांची तपासणी

जिल्ह्यातील कुपोषणाचे सर्वात जात प्रमाण कर्जत तालुक्‍यात आहे. सहा वर्षांपूर्वी मोरेवाडी येथे सोनाली पादीर या १८ महिन्यांच्या मुलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दर महिन्यात बालकांचे वजन घेण्यात येते आणि उंची मोजली जाते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने वयानुसार बालकांचे किमान वजन व उंची किती असली पाहिजे, याचे निकष निश्चित केले आहेत. या निकषाच्या आत वजन आणि उंची भरल्यास, संबंधित बालक हे कुपोषित समजले जाते.

पोषण आहाराचे काम महिनाभर ठप्प

ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अंगणवाडी सेविकांनी काम महत्त्‍वपूर्ण आहे. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना ताजे अन्न शिजवून देण्याबरोबरच लाभार्थ्यांना घरपोच सुक्या अन्नांच्या पाकिटांचेही त्यांना वाटप करावे लागते; मात्र जवळपास महिनाभर सुरू असलेल्‍या संपामुळे बहुतांश अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराचे वाटप ठप्प झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com