Department Of Revenue Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Department : पुणे विभागातील तहसीलदारांची होणार दप्तर तपासणी

Latest Marathi News : शासनाने जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार हे अधिकार तहसीलदारांना दिले. यामध्ये तहसीलदारांनी फक्त हस्तदोष असलेल्या चुका दुरुस्त करण्याचे आदेश देणे आवश्यक होते.

Sandeep Navle

Pune News : शासनाने जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार हे अधिकार तहसीलदारांना दिले. यामध्ये तहसीलदारांनी फक्त हस्तदोष असलेल्या चुका दुरुस्त करण्याचे आदेश देणे आवश्यक होते. मात्र, काही जणांनी काही शेरे कमी करण्याचे आदेश जारी केले. त्यासंबंधीच्या तक्रारी शासनाकडे गेल्याने आता शासनस्तरावरून दप्तर तपासणी करण्याच्या सूचना महसूल सचिवांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार सात-बारा उताऱ्यामधील हस्तलिखित चुका दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांना अधिकार दिले होते. मात्र, काही तहसीलदारांनी अधिकार नसताना नवीन शेतीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल झालेले शेरे, वारसांच्या नोंदी आदी वैध व कायदेशीर नोंदी कलम १५५ नुसार आदेश जारी करून हे शेरे कमी केल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी शासनाने केल्या होत्या.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानुसार राज्य शासनाने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील सर्व तहसील कार्यालयातील १५५ च्या आदेशाची तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

विभागातील तहसीलदारांनी मागील दहा वर्षांत कलम १५५ चा वापर करून पारीत केलेल्या सर्व आदेशांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी.

या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करावी. ही तपासणी १५ दिवसांत पूर्ण करून या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश महसूल अपर मुख्य सचिव यांनी दिले आहेत.

काय आहे प्रकरण

- हस्तलिखित सात-बारा उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात आले. या वेळी संगणकीकृत (ऑनलाइन) सात-बारा उताऱ्यावर काही लेखनातील चुका झाल्या.

- खातेदाराच्या नावात काना, मात्र, वेलांटी, उकार अशा चुका तसेच सात-बारा उताऱ्यावरील क्षेत्रामध्ये चुका झाल्या आहेत. संगणकीकृत सात-बारा उताऱ्यावर.

- झालेल्या या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार हे अधिकार तहसीलदारांना दिले. त्या दुरुस्त्या झाल्या नाही, याचीच तपासणी आता होणार आहे.

जिल्हा --- तहसील कार्यालये

पुणे -- १४

सातारा -- ११

सोलापूर -- ११

सांगली -- १०

कोल्हापूर -- १२

एकूण -- ५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT