Dhule Revenue Department : धुळ्यात शासनाच्या तिजोरीत ६३ कोटी

मार्चअखेर महसूल प्रशासनाने शेतसारा, शेतजमीन एनए करताना भरावे लागणारे शुल्क, वतन, सरंजामनिहाय भरून घेतलेली नजराणा रक्कम, इतर गौण खनिजांचे कर संकलित करताना काटेकोर नियोजन केले.
Department Of Revenue
Department Of RevenueAgrowon
Published on
Updated on

Dhule News : जमीन महसूल आणि गौण खनिजातून ३१ मार्चअखेर ६३ कोटी २५ लाख २४ हजारांचा महसूल जिल्हा प्रशासनाने प्राप्त केला. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडली.

दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १००.३१ टक्के महसूल मिळविण्याचे कामकाज जिल्हा महसूल प्रशासनाने केले. धुळे ग्रामीणने ११६.९४ टक्के महसूल वसुली केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांच्या मार्गदर्शनासह सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

मार्चअखेर महसूल प्रशासनाने शेतसारा, शेतजमीन एनए करताना भरावे लागणारे शुल्क, वतन, सरंजामनिहाय भरून घेतलेली नजराणा रक्कम, इतर गौण खनिजांचे कर संकलित करताना काटेकोर नियोजन केले.

करवसुलीचे काम कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी यांनी केले. सात-बारा, आठ अ उतारे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून शेतसारा, शिक्षण कर वसूल केल्यानंतरच त्यांची कामे पूर्ण केली. त्यामुळे १००.३१ टक्के वसुली करत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

Department Of Revenue
Solapur Collector Office Revenue : सोलापुरात मुद्रांक विभागाला दस्त नोंदणीतून ३९३ कोटीचा महसूल

जिल्ह्यात दगडखाणी, डेब्रिज, माती, रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उत्खननातून ९७.७८ टक्के उत्पन्न मिळाले. प्रपत्र अ जमीन कर महसुलासाठी, प्रपत्र ब गौण खनिजसाठी असे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते.

धुळे उपविभागातून सर्वाधिक महसूल वसूल झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील दोन प्रशासकीय उपविभागातील आठ तहसील व अपर तहसील कार्यालये मिळून २०२२-२०२३ साठी जमीन महसूल व गौण खनिज करातून ६३ कोटी सहा लाखांचे वसुली उद्दिष्ट देण्यात आले होते.

यात जमीन महसुलातून २९ कोटी २६ लाख, तर गौण खनिजातून ३३ कोटी ८० लाख महसूल वसुलीचे उद्दिष्ट मिळाले होते. ३१ मार्चअखेर जमीन व गौण खनिजातून सुमारे ६३ कोटी २५ लाख २४ हजारांचा महसूल गोळा करण्यात जिल्ह्यातील आठ तहसील व अपर तहसील कार्यालयांना यश मिळाले.

जमीन महसुलातून ३० कोटी २० लाख ३४ हजार महसूल प्राप्त झाला. गौण खनिजातून ३३ कोटी चार लाख ९० हजार महसूल मिळाला.

Department Of Revenue
Revenue Department strike : महसूल विभागाचे कामकाज सोमवारपासून ठप्प होण्याची शक्यता

तहसीलनिहाय महसूल वसुली (लाखांत)

तहसील - वसुली - टक्केवारी

धुळे ग्रामीण- १५३३.१६ - ११६.९४

धुळे शहर- ६५४.२१ - ७७.२४

साक्री - ९८२.१६ - १०६.५२

पिंपळनेर- ६५८.४९- १०५.८७

शिरपूर - ९८४.७९ - ९३.३५

शिंदखेडा - ९४९.०३ - ९७.८४

दोंडाईचा - ५६३.४०- ९५.४९

एकूण - ६३२५.२४ - १००.३११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com