Nagar Revenue Department : महसूल भवनातून नागरिकांची कामे जलदगतीने होतील

नगर येथे मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूला ४७ कोटी ८६ लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसूल भवनाचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या भूमिपूजन हस्ते झाले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilagrowon
Published on
Updated on

Nagar : जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वसामान्य व्यक्तींचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. नागरिकांना अत्यंत कमीवेळेत सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी महसूल भवनाच्या माध्यमातून सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येत आहेत.

प्रशासकीय यंत्रणेमध्ये विकेंद्रीकरण येऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन नवीन महसूल भवनातून नागरिकांची कामे अधिक गतीने होतील, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Revenue Department : तलाठ्यांवर अतिरिक्त गावांची जबाबदारी वाढली

नगर येथे मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूला ४७ कोटी ८६ लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसूल भवनाचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या भूमिपूजन हस्ते झाले. महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Radhakrishna Vikhe Patil
Jalgaon Revenue Department : जळगाव जिल्ह्यात १४६ सजे, २४ महसूल मंडले वाढली

विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागामध्ये एकसंघता येऊन जनतेची कामे वेगवान पद्धतीने व्हावीत, यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहेत. महसूल विभागाच्या सेवा जनतेला कार्यालयात न येता अत्यंत कमी वेळात व सुलभतेने मिळाव्यात यासाठी महसूल विभागाच्या सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यावर भर देण्यात येत आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Revenue Department Update : शहाद्यातील दहा मंडळांमध्ये कोतवाल पदे रिक्त

त्याचाच एक भाग म्हणून ‘वन अम्ब्रेला ॲडमिनिस्ट्रेशनवर’ भर देण्यात येत असून जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अशाच प्रकारचे महसूल भवनाच्या उभारणीसाठी नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पूर्वी जमिनीची मोजणी पारंपरिक पद्धतीने केली जात होती. जमीन मोजणीसाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रोव्हर मशिनने जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळेत करण्यात येत आहे.  

  ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

विखे पाटील म्हणाले, की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आपला जिल्हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यासह राज्यातील पशुधन वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे.

अशा शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com