Crop Variety  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : ‘वनामकृवि’च्या सात वाणांची अधिसूचनेसाठी शिफारस

Latest Agriculture News : राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक गुरुवारी (ता. ८) ऑनलाइन झाली. राज्‍याचे अप्पर मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार अध्यक्षस्थानी होते.

माणिक रासवे

Parbhani News : राज्य बियाणे उप-समितीकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून विकसित सोयाबीन, कपाशी, ज्वारी, हरभरा, तीळ या पिकांसह मिरची व टोमॅटो ही भाजीपाला पिके, असे एकूण ७ वाण अधिसूचित करण्यासाठी केंद्रीय बियाणे समितीकडे शिफारस करण्यात आली आहे.

राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक गुरुवारी (ता. ८) ऑनलाइन झाली. राज्‍याचे अप्पर मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सोयाबीनचा ‘एमएयूएस ७३१’, अमेरिकन कपाशीचा ‘एनएच ६७७’, हरभरा देशी वाण ‘परभणी चना १६’, खरीप ज्‍वारीचा ‘परभणी शक्‍ती’, तीळाचा ‘टीएलटी १०’, मिरचीचा ‘पीबीएनसी १७’ व टोमॅटोचा सरळ वाण ‘पीबीएनटी २०’ हे वाण अधिसूचित करण्यासाठी शिफारस करण्यात आली.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पीक पैदासकार डॉ. एस. पी. म्हेत्रे, डॉ. डी. के. पाटील, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. के. एस. बेग. डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. व्ही. एस. खंदारे यांचे अभिनंदन केले.

वाणांची प्रमुख वैशिष्‍टे ः

सोयाबीन ‘एमएयूएस ७३१’ ः या वाणाची उत्पादकता प्रतिहेक्टरी २८ ते ३२ क्विंटल आहे. विविध कीड-रोगास मध्यम प्रतिकारक, लवकर येणाऱ्या या वाणाची मराठवाडा विभागासाठी शिफारस.

अमेरिकन कपाशी ‘एनएच ६७७’ ः १५० ते १६० दिवस कालावधी. उत्पादन क्षमता हेक्‍टरी १२ ते १४ क्विंटल. जिवाणूजन्य, बुरशीजन्य रोग व रस शोषणाऱ्या किडीस प्रतिकारक. राज्यातील कोरडवाहू क्षेत्रासासाठी शिफारस.

हरभरा परभणी ‘चणा १६’ ः हा देशी वाण अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांत्रिकीकरणासाठी सुलभ, टपोऱ्या दाण्याचा. मराठवाडा विभागासाठी शिफारस.

तीळ ‘टीएलटी १०’ ः अधिक उत्पन्न देणारा टपोरा पांढरा दाणा. महत्त्वाच्या कीड व रोगास मध्यम प्रतिकारक. राज्यात खरीप व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस.

ज्वारी ‘परभणी शक्ती’ ः खरीप ज्वारीच्या या वाणाच्या धान्यांमध्ये अधिक लोह (४२ मिलिग्रॅम / किलो) व अधिक जस्त (२५ मिलिग्रॅम / किलो). उत्पादन २२ ते २५ क्विंटल प्रति हेक्टर. कडब्याचे ५२ ते ५५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादकता. राज्यात रब्बी हंगामासाठी शिफारस.

मिरची ‘पीबीएनसी १७’ ः प्रतिहेक्टर ५३१ ते ५४६ क्विंटल उत्पादकता. मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामासाठी शिफारस. ‘लिफकर्ल’ व ‘अॅंथ्राकनोझ’ रोगास मध्यम सहनशील.

टोमॅटो ‘पीबीएनटी २०’ ः सरळ वाण रब्बी हंगामात मराठवाडा विभागासाठी शिफारस. उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रतिहेक्टर. फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग. प्रतिफळाचे वजन ६० ते ६५ ग्रॅम. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहिली काढणी. ‘लिफकर्ल’ व फळामधील अळी, पांढरी माशी व फुलकिडे या किडीस मध्यम सहनशील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT