Crop Varieties : एकाच ठिकाणी गहू, हरभऱ्याच्या ६१ पीक वाणांची लागवड

Shiwar Feri 2023-24 : रब्बी २०२३-२४ या वर्षातील शिवारफेरीला प्रारंभ झाला. देशभरातील विविध संस्था, विद्यापीठांनी विकसित केलेल्या गहू, हरभऱ्याच्या सुमारे ६० पेक्षा अधिक वाणांची लागवड एकाच ठिकाणी बघायला मिळते आहे.
Shiwar Feri 2023-24
Shiwar Feri 2023-24Agrowon
Published on
Updated on

Akola News : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) पैलपाडा येथील प्रक्षेत्रावर शुक्रवारी (ता.१९) रब्बी २०२३-२४ या वर्षातील शिवारफेरीला प्रारंभ झाला. राज्यासह देशभरातील विविध संस्था, विद्यापीठांनी विकसित केलेल्या गहू, हरभऱ्याच्या सुमारे ६० पेक्षा अधिक वाणांची लागवड एकाच ठिकाणी बघायला मिळते आहे.

उद्‌घाटनाला महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, आर. आर. पाटील, यांच्यासह महाबीजचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. वल्लभराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शिवारफेरीला सुरुवात झाली.

Shiwar Feri 2023-24
Chana Crop : ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकावर परिणाम

पैलपाडा येथे महाबीजचे प्रक्षेत्र असून या ठिकाणी रब्बी हंगामात घेतले जाणारे हरभरा, गहू, टोमॅटो, वांगे, मका, संकरीत चारा, ज्वारी अशा पीक वाणांची लागवड केलेली आहे. यात प्रामुख्याने हरभऱ्याचे ३३ वाण असून, पारंपरिक वाणांसह यंत्राच्या साह्याने मळणी करता येईल, अशा वाणांची लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी या वाणांमधील उंची, फुले, घाटे, फुटवे अशा विविध वैशिष्ट्यांची थेट पाहणी करता येत आहे.

अशाच पद्धतीने गव्हाचेही राज्यासह भारतातील विविध संशोधन केंद्रांचे सुमारे २८ वाण पेरलेले आहेत. यात प्रत्येक गहू वाणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १९९१ मध्ये प्रसारित केलेला एकेडब्लू ३८१, एकेए डब्‍ल्यू ४६२७, एकेए डब्ल्यू ३७२२ (विमल), एकेए डब्ल्यू ४२१०-३ (पीडीकेव्ही सरदार), पंजाब कृषी विद्यापीठाचा पीबीडब्ल्यू ७५७, भारतीय कृषी संशोधन संस्था (इंदोर) निर्मित एचआय १५४४ (पूर्णा), एचआय १४१८ (नवीन चंदोसी),

Shiwar Feri 2023-24
Chana Varieties : यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त हरभरा वाण

लोकभारती भावनगर (गुजरात)चा लोकवन, गहू संशोधन केंद्र जुनागड (गुजरात) चा जी डब्ल्यू ४९६ यासह इतर विविध विद्यापीठ, संस्थांचे वाण लावलेले आहेत. हरभरा प्रात्यक्षिक क्षेत्रावर पूसा मान, सुपर अन्नेगिरी, महाबीज २००५, विजय, राजविजय २०३, पीडीकेव्ही कांचन, महाबीज २००३, बीजीएम पूसा हरभरा १०२१६, राजविजय २०२, दिग्विजय, फुले विक्रांत, महाबीज २००६, जजी ११, महाबीज २००२, जॅकी ९२१८, फुले विश्‍वराज अशा विविध वाणांची लागवड बघायला मिळते.

पैलपाडा क्षेत्रावर शुक्रवारी यंदाची रब्बी शिवारफेरी सुरू झाली. पाहणी करीत असतानाच शेतकरी या वाणांच्या वैशिष्ट्यांबाबत उत्सुकतेने माहिती घेत आहेत. पुढील काही दिवस विविध जिल्ह्यातील शेतकरी या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या पीकवाणांची पाहणी करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com