Silkworm Cocoon Agrowon
ॲग्रो विशेष

Silkworm Cocoon: रेशीम अळीने कोष न करण्याची कारणे अन् उपाय

Silk Farming Tips: रेशीम धागा उत्पादनासाठी तुती रेशीम, इरी रेशीम, टसर रेशीम आणि मुगा रेशीम हे कीटक महत्त्वाचे आहेत. रेशीम हे नैसर्गिक प्रथिन धागा आहे. रेशीम अळीने खाल्लेल्या तुती पानामधून हे प्रथिन उपलब्ध होते.

Team Agrowon

डॉ. चंद्रकांत लटपटे, धनंजय मोहोड, डॉ. संजोग बोकन

Reasons and Solutions for Silkworms Not Cocooning: रेशीम धागा उत्पादनासाठी तुती रेशीम, इरी रेशीम, टसर रेशीम आणि मुगा रेशीम हे कीटक महत्त्वाचे आहेत. रेशीम हे नैसर्गिक प्रथिन धागा आहे. रेशीम अळीने खाल्लेल्या तुती पानामधून हे प्रथिन उपलब्ध होते. उच्च प्रतीच्या कोष निर्मितीसाठी उत्तम प्रतीची तुती बाग आवश्यक आहे.

समस्या

रेशीम अळीची पहिल्या अवस्थेतील वाढ पूर्ण झाल्यावर परिपक्वतेची लक्षणे न दिसणे, कोष न करणे यालाच नॉन स्पीनिंग सिन्ड्रोम असे म्हणतात. रेशीम किटक कोष न करण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

संगोपन काळात रेशीम अळीचा कीडनाशके किंवा अल्कोहोलच्या वाफेचा संपर्क आल्यास रेशीम ग्रंथीची सामान्यपणे वाढ होत नाही.

रेशीम ग्रंथीमधील रेशिमाची जास्ती किंवा कमी द्रव्यता असेल तर रेशीम किटक रेशीम धागा करण्यापासून वंचित राहतात.

परिपक्व वाढ झालेल्या रेशीम अळीस मर्यादित तापमान (२५ अंश सेल्सिअस) लागते. त्यांच्यासाठी स्वतंत्र कोष विणनगृह असावे. अन्यथा लोखंडी पत्र्याच्या संगोपन गृहात रेशीम अळ्यांकडून जास्तीची मूत्र निर्मिती होऊन मज्जासंस्था निकामी होते.

रेशीम अळीच्या शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन राहिल्यामुळे रेशीम किटक कोष करत नाहीत.

तुती पानावर कीटकनाशकांची शिफारशीपेक्षा जास्त फवारणी केल्यानंतर हे अंश तुती पानातून रेशीम अळीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे अळीची शरीरक्रिया बिघडते. उदा. आयजीआर संप्रेरक वापरामुळे अळीची संतुलित वाढ होत नाही, किटक पूर्ण वाढ होण्यापासून वंचित राहतात.

रोग प्रादुर्भावग्रस्त रेशीम अळी कोष करत नाहीत.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन आणि कापूस पिकावर कीडनाशकांच्या फवारण्या होतात. याच काळात रात्रीच्या वेळी कीटकनाशकांचा अंश हवेतून परिसरातील तुती पानांवर बसतो. ही पाने रेशीम अळीच्या आहारात गेल्याने या रसायनांचा त्यांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होतो.

तुती लागवडीपूर्वी घेतलेल्या पिकांमध्ये वापरलेल्या कीडनाशकांचे जमिनीत राहिलेले अंश तुतीच्या मुळातून पानात येतात. ही पाने खाद्यामध्ये आल्यावर अळ्यांवर परिणाम होतो.

तुतीवर शिफारस नसलेली कीडनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करू नये.

फळपिकांवर किंवा इतर पिकांवरील कीडनाशकांची फवारणी केलेले अंश हवेतून तुती पानावर येतात. ही पाने खाद्यात आल्याने अळ्यांवर परिणाम होतो.

अळ्यावर होणारा परिणाम

निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेतील रेशीम अळ्यांचा मृत्यू होतो.

शरीराचा आकार हूकसारखा किंवा आखूड होतो.

डोके तिरपे व शरीर लांब होते.

अळ्यांची परिपक्व संतुलित वाढ होऊन कोष तयार करत नाहीत.

अळ्या आखूड होऊन अंग बाहेर पडते.

उपाययोजना

इतर पिकांपासून तुती लागवडीचे सुरक्षित अंतर ठेवणे.

शेडच्याकडेने गिरिपुष्पची १० फुटापर्यंत वाढ करावी. शेड दोन्ही बाजूंनी शेडनेटच्या साहाय्याने आच्छादित करावी. ठिबक संचाच्या ड्रिपरचा वापर करून शेडनेटवरून खाली पाणी सोडावे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात हा उपाय करावा.

तुती लागवडीच्या शेजारच्या शेतातील पिकावर कीडनाशकांची फवारणी गरजेची असेल तर सकाळच्या थंड वातावरणात फवारणी करावी.

तुती लागवडीपूर्वी किंवा लागवडीनंतर मका, भेंडी, डाळवर्गीय पिके, भुईमूग, किंवा राजगिरा लागवड करावी. त्यानंतर प्रति हेक्टरी २० टन चांगले कुजलेले शेणखत जून व नोहेंबर महिन्यात दोन समान टप्यात देऊन हलके पाणी द्यावे. तुती पिकाला शिफारशीत प्रमाणात रासायनिक खताची मात्रा द्यावी.

- डॉ.चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२

(प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT