
Parbhani News: मागील आर्थिक (२०२४-२५) वर्षात परभणी जिल्ह्यात १८९.५४५ टन आणि हिंगोली जिल्ह्यात ६८.७७० टन मिळून एकूण २५८.३१५ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले आहे. या दोन जिल्ह्यांतील रेशीम कोष उत्पादनात २०२३-२४ मधील २२८ टन कोष उत्पादनाच्या तुलनेत ३० टन वाढ झाली आहे.
परभणी जिल्ह्यात ३८७ शेतकऱ्यांकडे जुनी ४२४ एकर व नवीन १३० शेतकऱ्यांकडे १३० एकर मिळून एकूण ५१७ शेतकऱ्यांनी ५५४ एकरवर तुती लागवड केलेली आहे. मागील आर्थिक वर्षात या शेतकऱ्यांनी २ लाख ६७ हजार ९५० अंडीपुंजांपासून १८९.५४५ टन कोष उत्पादन घेतले. २०२३-२४ मध्ये ३ लाख ५ हजार अंडीपुंजांपासून १६७ टन रेशीम कोष उत्पादन निघाले होते. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये कोष उत्पादनात २२.५४ टन वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यामध्ये २७८ शेतकऱ्यांकडे २७८ एकरवर जुनी तुती लागवड, तर १५२ शेतकऱ्यांकडे १५२ एकर नवीन तुती लागवड आहे. जुनी-नवी मिळून ४२५ शेतकऱ्यांकडे ४३० एकर तुती लागवड आहे. जुन्या २५५ आणि नवीन ११० मिळून एकूण ३६५ शेतकऱ्यांनी एकूण १ लाख ३३ हजार २०० अंडीपुंजांपासून ६८.७७० टन रेशीम कोष उत्पादन घेतले.
जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ लाख १२ हजार ९५० अंडीपुंजांपासून ६१.१६३ टन कोष उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ७.६०७ टन जास्त रेशीम कोष उत्पादन मिळाले, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे यांनी दिली.
जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली
तुलनात्मक रेशीम कोष
उत्पादन स्थिती (टनामध्ये)
जिल्हा २०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५
परभणी १४७ १६७ १८९
हिंगोली ५३ ६१ ६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.