Palghar News : ऑगस्टमध्ये सतत पडणारा पाऊस आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू आहे. एकीकडे ढगाळ वातावरण, हवामानात सातत्याने बदलामुळे भातपिकावरील किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भातावरील खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी या किडींसाठी अनुकूल वातावरण असून, या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जाणवत आहे..भातशेतात विशेषतः जेथे पाणी साचून राहते, अशा खोलीच्या खाचरांत काही कीड रोग होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरळीतील अळी आणि पाने गुंडाळणारी अळी या दोन किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. .Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका.भाताच्या शेंड्यावर पांढरा टाका पडल्यासारखे दिसत आहे. भातशेतीचे नियोजन करून वातावरणाच्या लहरीनुसार कृषी विज्ञान केंद्राने सुचवलेल्या उपाययोजनांवर भर देऊन अमलात आणाव्यात, असा सल्ला कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षकतज्ज्ञ डॉ. उत्तम सहाणे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे..या उपाययोजना कराव्यात...सुरळीतील अळीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी भरून घ्यावे. या पाण्यात एखादे कीटकनाशक किंवा काळेवंगण टाकावे.बांधावर उभे राहून आडवा दोर धरून भाताच्या रोपावरून फिरवत न्यावा. यामुळे पानावर लटकलेल्या अळ्या पाण्यात पडतात.हे पाणी खाचरातून बाहेर काढून टाकावे व पाणी बाहेर काढण्याच्या ठिकाणी सुती कापड लावून या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.भातपीक फुलोऱ्यात असताना दोरीचा वापर टाळावा, जेणेकरून फुलोरा गळून पडणार नाही..Paddy Crop Damage : चंद्रपुरात धान पिकावर पुराचे संकट.सायंकाळी सहा ते आठ या वेळेत शेताच्या बांधावर प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. यामुळे किडींचे पतंग प्रकाश सापळ्यात अडकून नियंत्रण होते.प्रादुर्भाव जास्त असेल, तर क्विनोलफोस दोन मिली किंवा प्रोफनोफोस एक मिली प्रतिलिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळीफवारणी करावी.पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी कारटप हायड्रोक्लोराइड चार टक्के दाणेदार १८८ ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात कीटकनाशक जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे. .दमट हवामानाचा भातशेतीवर परिणाम होतो. राखाडीमध्ये फोलीडॉल पावडर एकत्र करून फवारणी केल्यास किडींवर नियंत्रण मिळवता येईल. भातपीक फुलोऱ्यात असताना अळी नियंत्रणासाठी दोरीचा वापर टाळावा.- सचिन तोरवे, उपकृषी अधिकारी.भातशेतात एकरी १० पक्षी थांबे लावावेत. ते लावताना पाच फूट उंचीच्या दोन लाकडे उभी करून त्याला वरच्या बाजूने आडवी दोरी किंवा काठी बांधावी. यावर पक्षी बसण्यासाठी आकर्षित होतात.- डॉ. उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.