Water Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Storage : धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; नोव्हेंबरपासून पाणीपातळीत झाली घट

Water Shortage : देशातील धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. देशातील महत्वाच्या १५५ धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. देशातील महत्वाच्या १५५ धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बिहारमधील धरणांमध्ये देशातील सर्वात कमी २८ टक्के पाणीसाठा आहे. तर महाराष्ट्रातील राज्यांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे.

केंद्रीय जल आयोगाने देशातील महत्वाच्या धरणांमधील पाणीसाठ्याची माहिती दिली. देशातील धरणांमध्ये क्षणतेच्या ७१ टक्के पाणीसाठा आहे. पण ही पाणीपातळी गेल्यावर्षीपेक्षा आणि गेल्या १० वर्षातील सरासरीपेक्षा जास्त आहे. देशातील महत्वाच्या १५५ धरणांमध्ये १२७.९२१ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा होता. यंदा देशात पाऊसमान चांगले होते. देशाच्या बहुतांशी भागात पाऊस चांगल्या झाल्याने धरणांमधील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळेच यंदाची पाणीपातळी गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत आहे. 

देशातील धरणांमधील पाणीपातळी नोव्हेंबर महिन्यापासूनच कमी व्हायला सुरुवात झाली होती. पंजाबमधील धरणांमध्ये पाणीपातळी जास्त प्रमाणात कमी होत आहे. पंजाबमधील धरणांमध्ये १४ नोव्हेंबरपासून एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीपातळी कमी झाली. पश्चिमेकडील राज्यांमधील धरणांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा आहे. गोवा राज्यात ९८ टक्के पाणी साठा आहे.

उत्तर भारतात जास्त घट

उत्तर भारतात पाणीपातळीतील घट जास्त आहे. महत्वाच्या ११ जलाशयांमधील पाणीपातळी ४२ टक्क्यांनी आतापर्यंत कमी झाली. या जलाशयांची क्षमता १९.८३६ दशलक्ष घन मीटर आहे. पण सध्या केवळ ८.३७७ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा आहे. त्यातही पंजाबमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला. पंजाबमधील पाणीपातळी २० टक्क्यांनी कमी झाली. 

पूर्वेकडील राज्यांमधील ६७ टक्के पाणी 

पूर्वेकडील राज्यांमध्ये २५ महत्वाची जलाशये आहेत. या जलाशयांची एकूण क्षमता २०.७८९ दशलक्ष घम मिटर एवढी आहे. पण सध्या केवळ १३.९३६ दशलक्ष घन मीटर पाणीपातळी आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या ६७ टक्के पाणीसाठी धरणांमध्ये शिल्लक आहे. त्रिपुरा राज्यात पाणीसाठा चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्रिपुरातील जलाशयांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा आहे. तर बिहारमधील धऱणांमध्ये २७ टक्के पाणीसाठा होता. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये ६५ टक्के पाणीपातळी होती. 

महाराष्ट्रात ८४ टक्के साठा

राज्यात यंदा पाऊसमान चांगले होते. राज्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे यंदा धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. राज्यातील धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ८४ टक्के पाणीसाठा आहे. तर गुजरातमधील धरणांमध्ये ७८ टक्के पाणीसाठा आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT