
Sangali News : संख, जि. सांगली जत तालुक्यातील पूर्व भागातील वरदान ठरलेल्या संख मध्यम प्रकल्पात फक्त ९.०२ दशलक्ष घनफूट म्हणजेच १.२८ टक्के पाणासाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आठ ते दहा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असून शेती पिकांना, जनावरांना व पिण्याच्या पाण्याची झळ बसत आहे.
पाऊस कमी झाल्याने दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीतही घट झाली आहे. पाण्याची पातळी ४०० ते ५०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. उमराणी, तिकोंडी हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. तर उर्वरित तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरींतील पाणी पातळी कमी झाली आहे.
जत तालुका कायम दुष्काळी आवर्षण पर्जन्य छायेतील आहे. सततचा दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वर्षे शेतीतून चांगले उत्पादन मिळाले नाही. उन्हाळ्यात टँकरने पाणी देऊन द्राक्ष व डाळिंब बागेची जोपासना केली. पशुधन अडचणीत आले. परिणामी तालुक्यातील अर्थकारणावर चांगलाच परिणाम झाला होता.
तलाव, विहिरींना पाणी आले नाही. उन्हाची तीव्रतने विहिरी, कुपनलिका, बंधारे कोरडे पडू लागले आहेत. संख मध्यम प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. पूर्व भागातील उटगी येथील दोड्डीनाला प्रकल्पात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले होते. पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. दरीबडची, सिद्धनाथ या तलावातील पाणीसाठा मृतसंचयाखाली आला आहे.
देवनाळ कालव्यातून पाच्छापूर ओढ्यातून बोअर ओढ्याला पाणी सोडले होते. सिद्धनाथ तलावात पाणी आले होते. विधानसभा निवडणुकपूर्वी पाणी बंद केले आहे. सध्या तलावात पाणीसाठा ५.४० द.घ.ल.फू आहे. पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. सिद्धनाथ तलावातून पाणी बोर ओढ्यातून संख मध्यम प्रकल्पात जाते.
जतमधील प्रकल्पांमधील पाणीसाठा
प्रकल्पाचे नाव पाणीसाठा (दघलफू) टक्केवारी
मध्यम प्रकल्प, संख ९.०२ १.२८
सिद्धनाथ ५.४० ५.७९
जालिहाळ बुद्रुक ३.४० ४.३१
अंकलगी ३.७६ २.२९
पांडोझरी ११९.८१ ८८.००
तिकोंडी क्र. १ ०.०० ०.००
भिवर्गी २७८.५४ ८५.५५
सोरडी २०.०६ ४२.६१
दरीबडची १.६२ २.४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.