ॲग्रो विशेष

Raju Shetti : ...तर आमचा ऊस कर्नाटकात जाईल, राजू शेट्टींचा कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांना इशारा

Sugarcane Rate : कारखानदारांना ४०० रुपये देणे शक्य आहे परंतु हे देत नाहीत. यंदा बाजारात साखरेचे दर ३ हजार ६०० च्यावर गेले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवली होती. या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील संघर्ष अटळ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदार कोणतीच भूमिका घेणार नसतील तर आम्हाला कर्नाटकात ऊस घालण्याचा पर्याय असल्याचा थेट इशाराच दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजीत बैठकीत शेट्टी आपली बाजू मांडली यावेळी ते म्हणाले की, सध्या साखरेचा दर चांगला असल्याने साखर कारखानदारांनी किमान ४०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम द्यावी, अशी आमची मागणी आहे. परंतु कारखानदारांनी यावर कोणतीच भूमिका घेत नसतील तर आम्हाला आमचे पर्याय उपलब्ध असल्याचे शेट्टी म्हणाले.

कारखानदारांना ४०० रुपये देणे शक्य आहे परंतु हे देत नाहीत. यंदा बाजारात साखरेचे दर ३ हजार ६०० च्यावर गेले आहेत. यंदा साखर कारखानदारांना साखर आणि उपपदार्थांवरही जादा दर मिळाला आहे. सी रंगराजनसमिती आणि आरएसएफ कायद्यानुसार कारखानदारांकडे पैसे शिल्लक राहतात. यांना ४०० रुपये दर देणे सहज शक्य जर कारखानदारांनी आमची मागणी मान्य केली नाहीतर आमचा ऊस कर्नाटकमध्ये जाईल असा थेट इशाराच शेट्टी यांनी दिला.

मागच्या महिन्यात गणेशोत्सव अतिषय शांततेत साजरा झाला पुढे दसरा दिवाळी तोंडावर आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हातात चलन नसल्याने शेतकरी वाईट अवस्थेत आहेत. कारखानदारांकडे पैसे शिल्लक आहेत त्यांना दर देता येत नाही असे शक्य नाही. पुणे जिल्ह्यातील अनेक कारखानदारांनी एफआरपीपेक्षा ४०० जादा दर दिला.

कारखानदारांचे मौन

यावर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कारखानदारांमधील कोणाला बाजू मांडायची आहे का याबाबत विचारणा केली परंतु कोणत्याही साखर कारखान्यांनी ४०० रुपये जादा दर देण्यावर भाष्य करण्यास टाळले. दरम्यान गुरूदत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले की, यंदा साखरेला चांगला भाव आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु साखर कारखानदारांसमोर काही अडचणी आहेत त्या आम्हाला सोडवाव्या लागत आहेत.

सरकारच्या नियमानुसार एफआरपी तीन तुकड्यात द्यायचा कायदा असुनही आम्ही एकरकमी एफआरपी देत आहोत परंतु सी रंगराजन समितीच्या कायद्याच्या आरएसएफनुसार जो काही जादा रिव्हेण्यू येईल त्यावर आम्ही विचार करण्यास तयार असल्याचे घाटगे म्हणाले. परंतु त्यांनी साखरेच्या वाढलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना जादा दर देण्याचे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT