Paddy Harvesting : रत्नागिरीत उशिराने भात कापणीचा रब्बीवर परिणाम

Rabi Season : यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला असून भविष्यात पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्याचबरोबर उशिराने भात लागवड झाल्यामुळे कापणीलाही विलंब होईल.
Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : जिल्ह्यात रब्बी हंगामात साडेपाच हजार हेक्टरवर दरवर्षी लागवड केली जाते. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला असून भविष्यात पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्याचबरोबर उशिराने भात लागवड झाल्यामुळे कापणीलाही विलंब होईत.

त्याचा परिणाम रब्बी हंगामातील भाजीपाला लागवडीवर होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी लागवड किमान एक महिना उशिराने होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका हा कलिंगड लागवडीला बसू शकतो.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : ओटवणेत रंगला पारंपरिक नव कापणी सोहळा

कोकणात रब्बी पिके जास्त घेतली जात नाहीत. पावसाळा संपला की भात कापणीला प्रारंभ होतो. नोव्हेंबर महिन्यात पाण्याचा उद्भव असलेल्या ठिकाणी भाजीपाला, कडधान्य यासह भात लागवड केली जाते. उत्पन्नाचे साधन म्हणून याचा उपयोग करणारी कुटुंबे अत्यंत कमी होती; मात्र महिला बचत गट स्थापनेची मोहीम वेगाने राबविल्यानंतर उत्पन्नाचे साधन म्हणून होऊ लागला आहे.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : पावसाच्या उघडिपीनंतर पहिल्या टप्प्यातील भातपीक कापणी सुरू

पाण्यासाठी कच्चे बंधारे उभारणार

पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये १० कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिले आहेत.

यासंदर्भात नुकतीचे सर्व विभागांची बैठकही घेतली आहे. साडेआठ हजार बंधारे श्रमदानातून बांधण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. त्याचा वापर हिवाळी आणि उन्हाळी भाजीपाला लागवडीला होणार आहे.

रब्बी हंगामाचे नियोजन कृषी विभागाकडून सुरू झाले आहे. त्यासाठी आवश्यक खतसाठा उपलब्ध आहे. यंदा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रमदानातून बंधारे उभारण्यात येणार आहेत. अनुदानावर बियाणे वाटपाविषयी तयारी केली जात आहे.
- अजय शेंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com