Rajmata Jijau  Agrowon
ॲग्रो विशेष

Rajmata Jijau Birth Anniversary : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला रविवारपासून सुरुवात!

Birth Anniversary Celebration : या वर्षी रविवारी (ता. १२) ४२७ वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यकारणीचे सल्लागार ॲड. राजेंद्र ठोसरे यांनी दिली.

Team Agrowon

Buldana News : मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी रविवारी (ता. १२) ४२७ वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यकारणीचे सल्लागार ॲड. राजेंद्र ठोसरे यांनी दिली.

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत समन्वयक सुभाषराव कोल्हे यांच्यासह इतर उपस्थित होते. यंदाच्या सोहळ्याची सुरुवात सावित्री जिजाऊ दशोरात्रोत्सवाने झाली आहे. या सोहळ्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. शनिवारी (ता.११) केंद्रीय कार्यकारीणी मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सावित्री जिजाऊ दशोरात्रोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण केले जाईल.

सायंकाळी ५ वाजता जिजाऊ जन्मस्थळ, लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाऊ ब्रिगेडतर्फे दीपोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सिंदखेड राजा नगरीतील सर्व घरातून महिला दिवे आणून राजवाड्यावर तेवत ठेवणार आहेत. त्यानंतर ४२७ मशालींसह भव्य मशाल यात्रा निघेल. रात्री ८.३० वाजता जिजाऊ सृष्टी येथे जिजाऊ ब्रिगेडचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

रविवारी मुख्य जन्मोत्सव सोहळा

मातृतीर्थावर रविवारी मुख्य जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. सकाळी ६ वाजता जन्मस्थळी राजवाडा येथे मराठा सेवा संघाच्या प्रमुख जोडप्यासह महापूजा होईल. त्यानंतर सकाळी ७ वाजता वारकरी दिंडी सोहळा जन्मस्थळ राजवाडा ते जिजाऊ सृष्टी येथून भव्य पालखीसह निघेल. सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहण व सकाळी ९ ते ११ शाहिरांचे पोवाडे होतील.

सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत जिजाऊ सृष्टी हॉल येथे नवोदित वक्ते, नवोदित कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष सत्कार प्रकाशन सोहळा व सामूहिक शिवविवाह सोहळा होईल. मुख्य कार्यक्रम दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. शिवश्री ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा शिवधर्म पीठ येथे होईल. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी मराठा सेवा संघ व ३२ कक्षांचा समावेश असणाऱ्या विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात ढगाळ वातावरण कायम; अनेक जिल्ह्यांत आजही हलका पाऊस शक्यता

Banana Cultivation: थंडी कमी झाल्याने केळी लागवडीस पुन्हा सुरुवात

Local Body Elections: मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

Government Scheme: कुटूंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर सरकारकडून मिळणार २० हजारांची मदत; पाहूयात काय आहे योजना

Farmer Loan Waiver: ‘एकच नारा, सातबारा कोरा,अन्यथा पुन्हा नाही थारा’

SCROLL FOR NEXT