Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

Monsoon Rain : मॉन्सून उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती कमी झाली असल्याने जोर ओसरला आहे.

Team Agrowon

Pune News : मॉन्सून उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती कमी झाली असल्याने जोर ओसरला आहे. जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. पूर्व भागात पावसाने चांगलीच उघडीप दिली असून काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने वाफसा स्थिती येत आहे.

गेल्या सहा ते सात दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा जोर कमी-अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरत आली असल्याने ओढे नाले काही प्रमाणात वाहते झाले आहेत. अनेक ठिकाणी भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवात झाली आहे.

तर काही ठिकाणी शेतीकामे वेगात सुरू आहेत. पूर्व भागात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर भागांत पावसाने चांगलेच थैमान घातले होते. परंतु आता या भागात ढगाळ वातावरण कायम असले तरी अधूनमधून तुरळक सरी बसत आहेत. मंगळवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेलीतील हडपसर परिसरात २१.८ मिलिमीटर पाऊस पडला.

तर थेऊर, खेड शिवापूर, कळस भागांतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. भोरमधील वेळू येथे ४९.५ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण होते. मावळ, वेल्हे भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. तर जुन्नरमधील राजूर, डिंगोरे, आपटाळे येथे १५ मिलिमीटर पाऊस पडला. खेडमधील कन्हेरसर येथे ३९.५ मिलिमीटर पाऊस पडला असून उर्वरित भागात तुरळक सरी बरसल्या.

शिरूरमधील पाबळमध्ये १९.८मिलिमीटर पाऊस पडला. तर कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे येथे तुरळक सरी पडल्या. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या भागात शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी सुरू केली आहे. बारामतीतील लोणी भापकर येथे ४७.५ मिलिमीटर, मोरगाव ३७.० मिलिमीटर, वडगाव निमगाव १४.३ मिलिमीटर पाऊस पडला असून बारामती, माळेगाव, पणदरे भागांत हलक्या सरी पडल्या.

या पावसामुळे शेतकरी खरीप पेरणीसाठी वाफसा स्थितीची वाट पाहत आहेत. इंदापूर, दौंड भागांत पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम होते. पुरंदरमध्ये सासवडमध्ये २१.८ मिलिमीटर, भिवंडी ११.३, परिंचे येथे १५.० मिलिमीटर पाऊस पडला. इतर भागात पावसाने काहीशी उघडीप दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT