Monsoon Rain : मराठवाड्याला पावसाने धुतले

Rain Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांना पावसाने चांगलेच धुतले आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

Pune News : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांना पावसाने चांगलेच धुतले आहे. नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमधील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. सोमवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील चित्तेपिंपळगाव येथे १५०.५ मिलिमीटर पाऊस पडला.

Monsoon
Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने दाणादाण

दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे.त्यानंतर त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने झोडपले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासात अपवाद वगळता मृगाचा पाऊस सर्वदूर दमदार बरसला. तीनही जिल्ह्यांतील ४९ मंडलांत अतिवृष्टी झाली.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ३७ जालनामधील ८ व बीडमधील ४ मंडलांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३७ पैकी दहा मंडलांत १०० ते १५० किलोमीटर दरम्यान पाऊस झाला. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. दरम्यान, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ५८ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस पाऊस झाला. खानदेशातही पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळल्या.

Monsoon
Monsoon Rain : राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज; माॅन्सूनची राज्यातील आणखी काही भागात प्रगती

मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत चांगलीच हजेरी लावली नगर, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. नगर जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत चांगलीच हजेरी लावली.

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडळे

बिडकीन १४१.५, निळजगाव १४१.४, लोहगाव १४१.३, चिखलठाण १०३, करमाड १३८.३, काचनेर १२६.८, आडूळ १०४.३, ढोरकीन १०४, केदारखेडा १०५.८, जामगाव १००.३, परतूर १००.८, पावस १४३.८, उमराणे ११३, पारनेर १०५.५, वाडेगव्हाण १०७.३, कोळगाव ११२, कोरडगाव ११०.८, करंजी ११२.८, सलाबतपूर १००.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com