Heavy Rain : गडहिंग्लज, आजरा तालुक्‍यांत जोरदार पावसाने नुकसान

Monsoon Rain : बहिरेवाडी (ता. आजरा) येथे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. तेथील पावसाने ओढ्याला आलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्यामुळे बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्याची विहीर गाळाने बुजली.
Rain Update
Rain Update Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. बहिरेवाडी (ता. आजरा) येथे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. तेथील पावसाने ओढ्याला आलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्यामुळे बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्याची विहीर गाळाने बुजली. त्यात चार पाणी उपसा विद्युतपंप बुडाले. शेतीतील मातीही खरडून गेली आहे.

गेल्या आठवड्यापासून गडहिंग्लज, उत्तूर, काळभैरी डोंगर, हलकर्णी आदी भागात मुसळधार वळीव स्वरूपाचा पाऊस झाला. शनिवारी (ता. ८) सायंकाळी कापशी खोऱ्यासह बहिरेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. बहिरेवाडीवरून येणाऱ्या एका ओढ्याला या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी आले. हा ओढा गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळच्या हद्दीतून येत तो दुसऱ्या ओढ्याला एकत्र होत हिरण्यकेशी नदीला येऊन मिळतो.

Rain Update
Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

बेकनाळ येथे पूर्वेकडे शिवाजी मगदूम, निवृत्ती मगदूम, महादेव मगदूम, मारूती मगदूम, सुभाष मगदूम, आनंदा मगदूम यांची ओढ्याच्या काठालगत विहीर आहे. पावसाने ओढा आल्यानंतर त्याचे पाणी विहिरीत गेले. सोबत गाळही मोठ्या प्रमाणात गेल्याने निम्म्याहून अधिक विहीर बुजली आहे. त्यासोबत चार विद्युत पंपही बुडाले.

दोन पंप कसेबसे बाहेर काढले. परंतु त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार आहे. तसेच पेरणीसाठी तयार करून ठेवलेली तीन एकर जमिनीतील माती खरडून गेली आहे. जमिनीची धूप झाल्याने पुन्हा जमीन तयार करावी लागणार आहे. या ओढ्याच्या पाण्याने मगदूम कुटुंबियांचे साधारण तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Rain Update
Monsoon Rain : राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज; माॅन्सूनची राज्यातील आणखी काही भागात प्रगती

दरम्यान, बहिरेवाडीतील जोरदार पावसाचा परिणाम त्या परिसरातील अनेक गावांतील शेतीवर झाला आहे. पेरणी केलेल्या जमिनीतील माती आणि बियाणेही वाहून गेली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळसह परिसरात असलेल्या तालुक्यातील शेतजमिनींचेही नुकसान झाले आहे. आजरा व गडहिंग्लज कृषी विभागाने तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अनेक ठिकाणी वाफसा नाही

सलग पाऊस पडत असल्याने जमीन तयार असूनही केवळ वाफसा नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पाणथळ जमिनीतील पाणी हटता हटेना झाले आहे. माळरानावरील मुरमाड जमिनीत मात्र चांगला वाफसा असल्याने तेथील पेरण्यांना गती आली आहे. परंतु नदीकाठच्या आणि काळ्या जमिनीतील भात, सोयाबीन पेरण्या ठप्प झाल्या आहेत. जमिनीत वाफसा येईपर्यंत या पेरण्या खोळंबून राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंतेने ग्रासले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com