Nanded Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Rain: नांदेडला पावसामुळे खरिपाला जीवदान

Kharif Crops: जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे खरीप पिकाला जीवदान मिळाले आहे. अनेक भागात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस नव्हता.

Team Agrowon

Nanded News: जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे खरीप पिकाला जीवदान मिळाले आहे. अनेक भागात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस नव्हता. परंतु दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. सोमवारी सरासरी १७.४० मिलिमीटर पाऊस झाला. तर, मुदखेड आणि मालेगाव या दोन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला. पिकांची वाढही चांगली झाली. यामुळे शेतकऱ्यांनी अंतर मशागतीचे कामे आटोपून घेतली. परंतु मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली होती. 

अनेक ठिकाणी कापूस सोयाबीन तूर, उडीद, मूग या पिकांची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या होत्या. भारतीय हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु पाऊस भाग बदलून काही ठरावीक भागात होत होता.

यानंतर मागील दोन दिवसांपासून मात्र जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस सुरू झाला. रविवारी तसेच सोमवारी झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. हा पाऊस सर्वच तालुक्यासह विशेषतः नांदेड, अर्धापूर, मुदखेड, किनवट, माहूर या तालुक्यांत चांगला झाला.

सोमवारचा पाऊस मुदखेड तालुक्यात ७२ मिलिमीटर तसेच अर्धापूर तालुक्यातील मालेगाव मंडलात ८४ मिलिमीटर झाल्यामुळे या भागात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heat Wave: उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

Farmer Protest: पीकविमा न मिळाल्यास महाराष्ट्रदिनी ठिय्या आंदोलन

Soil Tillage Methods: जमिनीची मशागत करताना लक्षात ठेवायच्या ३ महत्त्वाच्या गोष्टी!

Samrat Choudhary Bihar CM: बिहारमध्ये 'सम्राट'राज; भाजपचा पहिला मुख्यमंत्री, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

Fertilizer Supply: खरीप हंगामासाठी वाढीव खत मंजूर

SCROLL FOR NEXT