Nanded Rain : पावसाच्या ‘कमबॅक’मुळे खरीप सुखावला

Heavy Rain : मागील २४ तासांत जिल्ह्यातील ३९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तर सरासरी ६०.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेडमध्ये मागील पंधरा दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा कमबॅक केले आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यातील ३९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तर सरासरी ६०.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर रखडलेल्या पेरण्याही आता सुरू झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात मे महिन्यामध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार पर्जन्यवृष्टी करत तुफान हजेरी लावली होती. यानंतर जूनमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीचे काम सुरू केले. परंतु मागील दहा जूनपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे पेरणी केलेले शेतकरी अडचणीत आले होते. तसेच काही शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे काम थांबविले होते. अशातच नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले.

Rain
Satara Rain: सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू झाला, हा पाऊस सायंकाळी तसेच मध्यरात्री वाढला. रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले झाल्याची माहिती मिळत आहे. हा पाऊस अनेक भागांत जोरदार झाला यामुळे पेरणी केलेल्या सोयाबीन, कपाशी, हळद, तूर, उडीद, मूग व ज्वारी या पिकांना दिलासा मिळाला आहे.

तर पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. मंगळवारचा पाऊस किनवट, माहूर, हदगाव हिमायतनगर, नांदेड, बिलोली, लोहा, भोकर, मुदखेड, अर्धापूर, नायगाव या तालुक्यांत सर्वाधिक झाल्यामुळे या अकरा तालुक्यातील ३९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात नांदेड, किनवट, माहूर, हदगाव व हिमायतनगर या तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप मोठे आहे. ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. आठ मंडळात १०० ते १५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Rain
Rain Update Vidarbha : पश्चिम विदर्भात हलक्या सरी

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड ७५, बिलोली ७०, मुखेड २४, कंधार ३४, लोहा ४२, हदगाव ७६, भोकर ५४, देगलूर ३७, किनवट १०४, मुदखेड १०१, माहूर १२२, धर्माबाद २५, उमरी ५८, अर्धापूर ५९, नायगाव ३९. चोवीसतासात झालेला सरासरी पाऊस ६०.३० मिलिमीटर.

अतिवृष्टीची नोंद झालेले महसूल मंडळ

नांदेड शहर ७४, नांदेड ग्रामीण ८४, तूप्पा ८४, वसरणी ८४, विष्णुपुरी ७३, लिमगाव ६५, वाजेगाव ८४, नाळेश्वर ६८, बिलोली ७३, कुंडलवाडी ७३, लोहगाव ७५, रामतीर्थ ७३, कापशी ८४, तळणी ८४, निवघा ७६, मनाठा ९४, तामसा ६९, पिंपरखेड ७६, मोघाळी ७३, मातूळ ६९, किनवट ९१, बोधडी ९९, इस्लापूर ६९, जलधारा ६९, शिवणी ७९, मांडवा ११९, दहेली १४७, शिंदगी १४१, उमरी बाजार १२५, मुगट ८५, हिमायतनगर १०१, जवळगाव १६१, माहूर १५६, वानोळा १४१, वाई ८८, शिंदखेडा १०३, दाभड ८४, नरसी ७५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com