Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा कापसासह भाजीपाल्याला फटका

Heavy Rain Crop Loss : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. १९) रात्री पाऊस झाला. या पावसाने कापसासह भाजीपाल्याचे नुकसान सुरूच आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. १९) रात्री पाऊस झाला. या पावसाने कापसासह भाजीपाल्याचे नुकसान सुरूच आहे. फूल शेतीलाही या पावसाचा फटका बसत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बीच्या पेरणीलाही या पावसाळ्यामुळे अडथळा निर्माण होत आहे.

परतीचा पाऊस गेल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. मागील पंधरा दिवसांत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसासह भाजीपाला, फूल शेतीला फटका बसत आहे. शनिवारी (ता. १९) सायंकाळी अहिल्यानगर, पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासा, राहता, राहुरी, कोपरगाव, अकोले, संगमनेर तालुक्यांतील अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाला.

नागापूर वडझिरे माणिकदौंडी, कोरडगाव, मिरी, टाकळी, नेवासा खुर्द, सलाबतपूर, राहुरी, देवळाली टाकळीमिया, ब्राह्मणी, वांबोरी, बारागाव नांदूर, सातत्र, तहाराबाद, धांदरफळ, आश्वी, शिबलापूर, तळेगाव, अकोले, समशेरपूर, साकीरवाडी, संगमनेर, घारगाव, साकुर, पिंपरने, घुलेवाडी, पोहेगाव श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीभान, राहता, पुणतांबा, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर या मंडलांत बऱ्यापैकी पाऊस झाला.

मध्यंतरी चार दिवस पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे रब्बीच्या पेरण्यास सुरू झाल्या होत्या, मात्र पुन्हा पाऊस पडत असल्याने व वाफसा मोडत असल्याने रब्बी पेरण्यांना अडथळा येत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसत आहे.

वेचणीला आलेला कापूस भिजून काळा पडत असून त्याचा दरावर परिणाम होत आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पडणाऱ्या धुक्यामुळे भाजीपाल्यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कापसासह अन्य पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT