Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धूळधाण

Heavy Rain Crop Loss : या आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, प्रामुख्याने बुलडाणा, खामगाव, शेगाव, मोताळा, जळगाव जामोद आदी तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे.
Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धूळधाण
Published on
Updated on

Buldana News : या आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून, प्रामुख्याने बुलडाणा, खामगाव, शेगाव, मोताळा, जळगाव जामोद आदी तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान आणखी वाढले आहे.

जिल्ह्यात दसऱ्याच्या काळात पावसाने मोठे नुकसान केले होते. दोन-तीन दिवसांत पाऊस उघडल्यानंतर शुक्रवारी (ता.१८) पुन्हा पावसाने हजेरी दिली. जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाट हा पाऊस झाला.

Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धूळधाण
Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

शुक्रवारी झालेल्या पावसाने खामगाव बाजार समितीत उघड्यावर असलेला हजारो क्विंटल माल झाकण्यासाठी एकच पळापळ झाली. त्यात काही माल ओलाही झाला. याच तालुक्यात काळेगाव मंडलात नदीनाले उधाणले. शेगाव तालुक्यातील माटरगाव मंडलात सुमारे ७०.३ मिलिमीटर म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्ह्यात जळगाव जामोद २८.४, संग्रामपूर १५.६, चिखली ३२.८, बुलडाणा ४३.३, खामगाव २३.८, शेगाव २९.७, मलकापूर २१.३, नांदुरा २३.४, मोताळा २९.६ असा दमदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यात बुलडाणा ३४.८, रायपूर १९, धाड ४३.८, पाडळी ४५, म्हसला ४४.८, साखळी बुद्रुक ४७, देऊळघाट ६९ मिलिमीटर पाऊस झाला.

Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धूळधाण
Grape Crop Damage : पावसाची द्राक्षावर अवकृपा

तर खामगाव तालुक्यात हिवरखेड २८.३, काळेगाव ५१, पारखेड ४४, जनुना ५६.८, शेगाव तालुक्यात माटरगाव मंडलात ७०.३, जलंब ४४.५, जवळा १७.३, मोताळ्यात बोराखेडी ३०.३, पिंपरी गवळी ३८.३, रोहिणखेड ३०, पिंपळगाव देवी ३१.८, शेलापूर बुद्रुक ३१.८, नांदुरा तालुक्यात नांदुरा ३९.३, वडनेर ३३, शेंबा २२.३, निमगाव २२.३, जळगाव जामोद मध्ये जळगाव ३१.८, जामोद ३१.८, पिंपळगाव काळे २२.३, वडशिंगी २४.३, आसलगाव ३१.८, आणि संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर १७.५, सोनाळा १९.५, पातुर्डा १४.८, कवठळ २४. ३ असा जोरदार पाऊस झाला.

पाऊस नुकसान ठळक

सोयाबीनचे नुकसान वाढत चालले.

वेचणीचा कापूस भिजला.

अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने उभे सोयाबीन कुजण्याची भीती.

सोयाबीन, मक्याला कोंब फुटू लागले.

वादळामुळे कपाशीचे पीक मोडून पडले.

पुराचे पाणी वाहल्याने पिके खरडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com