Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update: सर्वदूर पावसाची हजेरी; काही भागांत जोर कमी

Monsoon 2025: खानदेशात मागील पाच ते सात दिवसांत सर्वदूर पाऊस झाला आहे. काही भागांत कमी तर काही भागांत चांगला पाऊस झाला. रोज पाऊस हजेरी लावत आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात मागील पाच ते सात दिवसांत सर्वदूर पाऊस झाला आहे. काही भागांत कमी तर काही भागांत चांगला पाऊस झाला. रोज पाऊस हजेरी लावत आहे. खानदेशात मागील वर्षी १३० टक्क्यांवर पाऊस झाला होता. पावसाने ७ जून रोजीच मागील वेळेस अनेक भागांत जोरदार हजेरी लावली होती.

जूनच्या मध्यानंतरही चांगला पाऊस झाला. पेरण्यांनाही गती आली होती. यंदा मात्र ११ जूनपासून पाऊस येत आहे. त्यातही ११ ते १५ जून या कालावधीत जळगावातील मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव, चोपडा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा या भागात वादळी पाऊस झाला आहे. यात केळी व भाजीपालावर्गीय पिकांची हानी झाली आहे.

यंदा पावसाची सुरुवात बरी दिसत आहे. परंतु जोरदार पाऊस किंवा शेतीला, पेरणीला पोषक पाऊस अपवाद वगळता झालेला नाही. नंदुरबार, धुळ्यातील पश्चिम भागांत पर्वतीय भागातही पावसाचा जोर नाही. साक्री, नंदुरबारचा दक्षिण, पश्चिम भाग भातासाठी प्रसिद्ध आहे. या भागात पावसाचा जोर नसल्याने भात लागवड सुरू नाही.

जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६३२ मिलिमीटर, धुळ्यात ५५४ मिमी आणि नंदुरबारमध्ये सुमारे ८६५ मिमी पाऊस पडतो. यातील किमान २० ते २२ टक्के पाऊस या महिन्यात यायला हवा. यात जूनमध्ये अपेक्षित पावसाच्या आशेवर शेतकरी पेरणी, मशागती करीत आहेत. या आठवड्यातही सर्वदूर पाऊस झाला.

परंतु त्याचे प्रमाण सारखे नाही. काही भागांत हलका तर काही भागांत मध्यम पाऊस झाला. दुपारी ऊन व सायंकाळी पावसाळी वातावरण अशी स्थिती असते. दोन दिवसांत जळगाव, धुळे व नंदुरबारमधील अनेक तालुके, मंडलांत पाऊस झाला. जामनेरातील पूर्व भागातही कमी पाऊस आहे.

सोमवारी (ता. १६) दुपारी व सायंकाळीदेखील अनेक भागांत पाऊस झाला. जळगाव, एरंडोल, धरणगाव, चोपडा, यावल, जामनेर धुळ्यातील शिरपूर, धुळे या भागात दुपारी हलका ते मध्यम पाऊस झाला. जळगाव तालुक्यातील काही भागांत १५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे काळ्या कसदार जमिनीतील मशागत, पेरणीची कामे वाफसा नाहीसा झाल्याने थांबवावी लागली.

तापी नदी कोरडीच

खानदेशात अनेकदा १२ किंवा १५ जूननंतर तापी नदीस प्रवाही पाणी किंवा मध्यम प्रकारचा पूर येतो. कारण तापी नदीचे उगमक्षेत्र मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात तापी नदीला विदर्भातील पूर्णा नदीदेखील येऊन मिळते.

जळगाव जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या नद्यादेखील तापी नदीला येऊन मिळतात. यात सातपुडा पर्वतातील नद्यांचा अधिक समावेश आहे. परंतु यंदा सातपुड्यातही जोरदार पाऊस न झाल्याने नद्या, नाले खळाळलेले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Sowing 2025 : रब्बी हंगामातील पेरणी जोमात; मागील वर्षीच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी आघाडी

Farmer ID: अकोल्यातील ४१ हजार शेतकरी फार्मर आयडीपासून लांब

Pomegranate Farming: डाळिंब बागेत पीक संरक्षणासह मधमाशी संवर्धनासह भर

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी

Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी 

SCROLL FOR NEXT