Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : वादळी वाऱ्यांसह पावसाने दाणादाण

Rain Update : या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामध्ये देवळा तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Team Agrowon

Nashik News : रविवारी (ता. ९) पावसाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामध्ये मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा जोर दिसून आला. दुपारनंतर मृगाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार सुरुवात झाली होती. या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामध्ये देवळा तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्ह्यात ८ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामध्ये ३६ महसूल मंडलांमध्ये पावसाचा जोर दिसून आला आहे. उमराणे येथे सर्वाधिक ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उमराणे परिसरातील कांदा शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

देवीदास आहेर (वय ३४) उमराणे येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता. वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू झाल्यानंतर ते शेडमध्ये आसरा घेण्यासाठी थांबला होता. मात्र, अतिवादळाने शेड कोसळून देवीदासचा त्याखाली दबून मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील आकाश शरद देवरे (वय २१) पावसाच्या भीतीने मोकळ्या जागेत बांधलेले वासरू सोडण्यासाठी गेला असता त्याच्यावर वीज कोसळून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी मालेगाव येथे नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. तिसगाव येथील दोन्ही तरुणांच्या आकस्मिक निधनाने गावावर शोककळा पसरली.

या महसूल मंडलांत अतिवृष्टी

मंडल पाऊस (मिमी)

सौंदाणे ७९.८

चांदवड ७३.३

दिघवद ९०.३

वडनेर ८०

वडाळी ९०

देवळा ७४.५

उमराणे ११३

पांगरी ९४

जिल्ह्यातील नुकसान

निफाड तालुक्यातील नांदूर येथे वीज कोसळून गाय मृत्युमुखी

उमराणे येथील गायत्री सूरज देवरे (वय २२) व अभय अजय देवरे (वय ३.५) जखमी

उमराणे परिसरात दहा ते पंधरा घरांचे पत्रे उडाल्याने लाखोंचे नुकसान

देवळा येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने नुकसान

येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे सौर कृषी संचावर वीज पडून नुकसान

येवला तालुक्यातील पाटोदा येथे झाड कोसळल्याने म्हैस ठार

चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथे रोपवाटिकेचे पॉलिहाऊस उडाल्याने ९ लाखांचे नुकसान

अनेक ठिकाणी विद्युतवाहक ताराही तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

SCROLL FOR NEXT