Ujani Dam Boat sank : वादळी वाऱ्याचा तडाखा! भीमा नदी पात्रात उलटली बोट; ६ बेपत्ता, एनडीआरएफचे पथकाकडून शोध सुरू

Boat sank in Ujani Dam : वादळी वाऱ्याने भीमा नदी पात्रास तडाखा दिला असून येथे बोट उलटी. यामुळे ६ जण बेपत्ता झाले आहे. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये एका वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.
Ujani Dam Boat sank
Ujani Dam Boat sankAgrowon

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथील भीमा नदीत मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. येथे प्रवासी बोट नदी पात्रात वादळी वाऱ्यामुळे उलटल्याने ६ जण बेपत्ता झाले आहे. ज्यात एका वर्षाच्या बालकाचा समावेश असून सध्या घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. पथकाकडून शोध घेतला जात असून अद्याप कोणाचा शोध लागलेला नाही. तर ही घटना यातीलच एक जण पोहत किनाऱ्यावर आल्याने उघडकीस आली. ही घटना येथे घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथील भीमा नदी पात्रात मंगळवारी संध्याकाळी एक बोट ७ प्रवासी घेऊन प्रवास करत होती. यादरम्यान येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत होता. यावेळी वादळीवाऱ्याने ती उलटली. ज्यामुळे बोटीतील ६ जण बेपत्ता झाले आहेत. मात्र यातील एक जण पोहत किनाऱ्यावर आला. यामुळे ही दुर्घटना समोर आली. यानंतर शोध मोहिम सुरू झाली. मात्र रात्री ९ वाजेनंतर ती थांबवण्यात आली. यादरम्यान उजनी जलाशयात बुडालेले बोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ती किनाऱ्यावर नेण्यात आली आहे. मात्र उजनी जलाशयात बुडालेल्या कोणाचाही अद्याप शोध लागलेला नाही.

Ujani Dam Boat sank
Ujani Dam : सोलापूरसाठी ‘उजनी’तून भीमा नदीत पाणी सोडले

बुडालेल्यांची नावे

कृष्णा दत्तू जाधव (व-२८), कोमल कृष्णा जाधव (व-२५), वैभवी कृष्णा जाधव (व-२.५), समर्थ कृष्णा जाधव (व- १) हे सर्व झरे गावातील आहेत. तर कुगांव गावातील दोघांचा यात समावेश असून १६ वर्षीय गौरव धनंजय डोंगरे आणि अनिकेत ज्ञानदेव अवघडे (व-२१) अशी यांची नावे आहेत.

रात्री वाजेपर्यंत शोध मोहिम

मंगळवारी घडलेली घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. जी रात्री ९ वाजता थांबविण्यात आली होती. आता बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ती सुरू करण्यात आली असून बुडलेली बोट ३५ फूट खोल सापडली आहे.

Ujani Dam Boat sank
Ujani Dam : मार्चमध्येच उजनी धरण पोहोचले उणे ३६ टक्क्यांवर

दरम्यान या घटनेबाबात पुणे ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार पासून या घटनेवरून उजनीत शोध मोहिम व्यापक करण्यात आली आहे. सध्या एनडीआरएफचे पथक शोध घेत आहे. तर घडनास्थळी एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन ही आहे. या दुर्घटनेत चार पुरुष, दोन महिला आणि दोन छोट्या मुलांचा समावेश आहे.

घटनास्थळी रणजितसिंह नाईक निंबाळकर

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथे घडलेल्या घटनास्थळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत माहिती घेतली आहे. तसेच प्रशासनास सूचना दिल्या.

यापूर्वीही १० डॉक्टर बुडाले

उजनी धरणात यापूर्वीही १० डॉक्टर मित्रांसोबत गेले होते. त्यांचा उजनी धरणात बुडून मृत्यू झाला होता. तर ही घटना सेल्फी घेताना घडली होती. यानंतर आता ही मोठी दुर्घटना घडल्याने मोठी खळबळ उडालेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com