Fruit Farming Success Story: पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेती फायद्याची ठरू शकते, हे सोलापूर जिल्ह्यातील पेनूर (ता.मोहोळ) येथील प्रवीण बाळू भांगे या उच्चशिक्षित तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. प्रवीण यांनी शेतामध्ये ‘तैवान पिंक’ पेरूची बाग फुलवली आहे. त्यांनी दर्जेदार पेरू उत्पादन घेत कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आहे.