Uncontested Election: कायदेशीरदृष्ट्या बिनविरोध निवडणूक ही मान्य असली, तरी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे. राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी केवळ निवडणूक प्रक्रिया पार पाडणे इतकीच नसून, निवडणूक वातावरण मुक्त आणि भयमुक्त ठेवणे ही देखील आहे.