Crop Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Impact : पावसाचा उडीद, मुग पिकास फटका

Crop Damage : खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस येत आहे. जोरदार सरीही मंगळवारी (ता. २०) अनेक भागात बरसल्या. यात आता उडीद व मूग ही पिके हातची जाण्याची चिंता वाढत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पाऊस येत आहे. जोरदार सरीही मंगळवारी (ता. २०) अनेक भागात बरसल्या. यात आता उडीद व मूग ही पिके हातची जाण्याची चिंता वाढत आहे.

हलक्या, मुरमाड जमिनीत पावसाची नितांत गरज होती. परंतु काळ्या कसदार, पाण्याचा निचरा न होणाऱ्या क्षेत्रात पावसाची गरज नव्हती. शेतीकामेही मागील आठ दिवस सुरू होती. कारण जून व जुलैत पावसाची उघडीप नसल्याने आंतरमशागत व अन्य कामे रखडली होती. ही कामे मागील आठ ते १० दिवस पावसाची उघडीप असल्याने सुरू होती.

परंतु सोमवारी (ता. १९) व मंगळवारी (ता. २०) खानदेशातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. मंगळवारी जळगाव, भुसावळ, जामनेर भागांत जोरदार पाऊस झाला. तसेच चोपडा, यावल, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांतही पावसाने सोमवारी, मंगळवारी हजेरी लावली. धुळ्यातील धुळे, साक्री भागांतही पाऊस झाला.

पावसाने कोरडवाहू पिकांना दिलासा मिळत आहे. परंतु उडीद व मूग पिकात शेंगा पक्व होत आहेत. या पिकांत सध्या अतिपावसाची किंवा जोरदार पावसाची गरज नाही. मध्यंतरी अतिपावसाने किंवा सततच्या पावसाने उडीद पिवळा पडून त्याचे नुकसान झाले आहे. आता दोन दिवसांपासून पाऊस असल्याने मूग पिकातील शेंगा खराब होऊन नुकसान होईल, अशी स्थिती आहे.

पाऊस व ढगाळ, आर्द्रतायुक्त वातावरणही कायम आहे. यामुळे शेंगांतील ओलावा कायम आहे. शेंगा पक्व होऊन कोरड्या होत असतानाच पाऊस आल्याने नुकसानीची भीती अधिक आहे. पाऊस सुरूच राहिल्यास शेंगांना कोंब फुटतील व नुकसान होईल, अशीही भीती शेतकऱ्यांना आहे. खानदेशात उडीद, मुगाची पेरणी मागील वेळेस कमी होती.

कारण पाऊस कमी व हवा त्या वेळेस नव्हता. दुष्काळी स्थितीने उडदाची पेरणी अनेक शेतकरी करू शकले नव्हते. यंदा पाऊस वेळेत आल्याने उडीद, मुगाची पेरणी अनेक शेतकरी वेळेत करू शकले. परंतु सततच्या पावसाने उडीद, मूग पीक यंदा हाती येणार नाही, असे दिसत आहे.

मागील वेळेस उडदाचा प्रतिक्विंटल १० हजार रुपये कमाल दर सुरुवातीला मिळाला होता. कारण आवक कमी होती. यंदाही पेरणी कमी आहे. जिल्ह्यात १८ ते १९ हजार हेक्टरवर उडीद तर १७ ते १८ हजार हेक्टरवर मूग पीक असते. परंतु यंदा मूग व उडदाची पेरणी घटली आहे. उडदाची पेरणी फक्त १६ हजार हेक्टरवर झाली आहे.

तर मुगाची पेरणीदेखील सुमारे १५ हजार हेक्टरवर आहे. खानदेशात धुळे, नंदुरबारात उडीद, मूग पीक अल्प आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतही उत्पादन कमी येणार आहे. पुढे दर मिळतील, अशी अपेक्षा उडीद, मूग उत्पादकांना आहे. परंतु पावसाने या अपेक्षांवर पाणी फिरेल की काय, अशीही चिंता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

Onion Rate : कांदा दरासाठी आमदार अंबादास दानवेंचं समृद्धी महामार्गावर आंदोलन; पोलिसांनी दानवेंना घेतलं ताब्यात

India Economic Crisis: आर्थिक आपत्तीचे इशारे आणि शांत मध्यमवर्ग

SCROLL FOR NEXT