E-Crop Survey App Issue : ई-पीकपाहणी नोंदणीत शेतकऱ्यांना अडचणी

Technical Difficulties : ई-पीकपाहणी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र मोबाइलवरून ॲपच्या माध्यमातून पीकपाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Nashik News : ई-पीकपाहणी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र मोबाइलवरून ॲपच्या माध्यमातून पीकपाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये मोबाइल नेटवर्कबरोबरच ॲपमध्ये माहितीची नोंद होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी जिल्ह्यात मंगळवारअखेर (ता. २०) अवघा १५ टक्के क्षेत्रावरच पीक पेरा नोंदवला गेल्याची स्थिती आहे.

ई-पीकपाहणीमध्ये नोंदवलेल्या पिकालाच अंतिम गृहीत धरले जाते. त्यामुळे ई-पीकपाहणी महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकरी दोन आठवड्यांपासून नोंदणीसाठी प्रयत्न करत आहेत. अगोदरच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्क नसल्याने अडचणी आहेत. वापरकर्त्यांनी ही भरण्याची प्रक्रिया समजून घेतली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.

Farmer Issue
E Peek Pahani : नेटवर्कमुळे पीक पाहणीच्या नोंदीपासून शेतकरी वंचित

पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी ई-पीकपाहणी पहिला टप्पा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे महसूल विभागाच्या संबंधी जमाबंदी आयुक्त व भूमि अभिलेख संचालक यांच्याकडून खरीप हंगामातील पीकपाहणी वेळेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले; परंतु ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी जिल्ह्यातील नोंदणी संथ झाली आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असतानाही ती पूर्ण होईल का? असा सवाल शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांनी कळविलेल्या अडचणी

ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कच्या अडचणी

ई-पीकपाहणी करताना माहिती भरली जाते, मात्र त्याची नोंद होऊन ती समाविष्ट होत नाही

अर्ज भरण्यासाठी संकेतांक वेळेवर येत नाही प्राप्त झाला तरीही माहिती पुढे भरण्याची प्रक्रिया संथ होते

सर्व्हर कनेक्ट होत नसल्याने कामकाज रखडले आहे

Farmer Issue
E Peek Pahani : ई-पीक नोंदणीतील अडथळे कायम

जिल्‍ह्यातील नोंदणी स्थिती

एकूण खातेदार ९,६९,५५३

पीकपाहणी केलेली खातेदार संख्या ७७,४६७

खातेदार टक्केवारी ७.९९

जिल्ह्यात झालेली पेरणी (हेक्टर) ६,३९,१५५.३६

एकूण पीकपाहणी झालेले क्षेत्र ९९,५१८

टक्केवारी १५.४९

गेल्या आठवड्यापासून प्रयत्न करूनही मोबाइलवरून ॲपच्या माध्यमातून माहिती भरुण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे महसूल विभागाने तांत्रिक अडचण सोडवावी.
साहेबराव सैद, शेतकरी, खैरगव्हाण, ता. येवला
माहिती नोंदवली जात नाही. अनेक अडचणी येत आहेत. भरलेली माहिती सर्व्हरला २४ तासांत अपलोड होऊन सबमिट झाली पाहिजे पण सध्या ती होत नाही.
राहुल पाटील, शेतकरी, लासलगाव, ता. जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com