Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : नाशिक जिल्ह्यात रब्बी पेरण्यांना येतेय गती

Rabi Season 2024 : यंदा जिल्ह्यात पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख १३ हजार ५७६ हेक्टर आहे. मंगळवारअखेर ३९ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यातील कामे प्रभावित झाली. अनेक ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिल्याने रब्बी हंगामातील कामे खोळंबली होती. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही शिवारात पाणी आहे त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या टप्प्याटप्प्याने होत आहेत. जिल्ह्यात मंगळवारअखेर (ता. ३) ३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

यंदा जिल्ह्यात पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख १३ हजार ५७६ हेक्टर आहे. मंगळवारअखेर ३९ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या सुरू झाल्या असून मालेगाव तालुक्याची आघाडी आहे. तर सर्वांत कमी पेरा पेठ तालुक्यात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा गव्हाचा असतो.

मात्र आतापर्यंत अवघ्या ३० टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली. त्यानंतर हरभरा पिकाचा दुसरा नंबर लागतो. ही पेरणी अवघी ३४ टक्के झाली आहे. तर मका पिकाकडे चाऱ्यामुळे व धान्यामुळे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. तर ज्वारीचा पेरा हा सरासरी क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक झाला आहे.

सिन्नर तालुक्यात ज्वारीचा पेरा सर्वाधिक आहे. तर येवला, मालेगाव, कळवण, सुरगाणा व नांदगाव तालुक्यात पेरणी आहे. गव्हाची निफाड तालुक्यात सर्वाधिक पेरणी होते. मात्र मालेगाव तालक्यात यंदा हंगामात सर्वाधिक पेरा आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणावर गहू पेरणी आहे.

मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड, नांदगाव, देवळा तालुक्यात मका लागवडी होत आहेत. तर हरभऱ्याचा सर्वाधिक फेरा मालेगाव तालुक्यातील असून सर्व जिल्हाभर कमी अधिक प्रमाणावर या पिकाचे क्षेत्र आहे.

मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक भागांत विहिरींमध्ये पाण्याचा साठा झाला आहे. धरणेही तुडुंब आहेत. त्यामुळे प्रामुख्याने गहू, हरभरा पिकाचे क्षेत्र उशिराने वाढण्याची शक्यता आहे.

गळीत धान्य पिकांची पेरणी शून्यावर

जिल्ह्यात गळीत धान्य पिकांमध्ये करडई, जवस, तीळ व सूर्यफूल या पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५७ हेक्टर आहे. या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस अत्यल्प झाले मात्र असे असतानाही एकाही धान्य पिकाची पेरणी झाली नाही. त्यामुळे उत्पादकता व बाजारातील दराचा प्रश्न असल्याने हे पीक नाशिक जिल्ह्यातून दिवसेंदिवस कमी होत असल्याचे यंदाच्या हंगामात चित्र आहे.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी हंगामातील कामे प्रभावित झाली होती. मात्र आता टप्प्याटप्प्याने पेरण्यांची गती वाढत असून पेरणीचा टाका वाढणार आहे.
- कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT