Rabi Sowing : मराठवाड्यात १८ लाख २७ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

Rabi Season : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण २१ लाख ५ हजार १०९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख २७ हजार १० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Samhajinagar News : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण २१ लाख ५ हजार १०९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख २७ हजार १० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

त्यामध्ये लातूर कृषी विभागाअंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यात पेरणी झालेल्या १२ लाख ३३ हजार ६०१ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांतील पेरणी झालेल्या ५ लाख ९३ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रांचा समावेश आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : शेतात पाणी असल्याने पेरण्या लांबणीवर

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर आहे. या क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ५ लाख ९३ हजार ४०९ हेक्‍टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर कृषी विभागाचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजर ९३० हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी १२ लाख ३३ हजार ६०१.३० हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९०.४४ टक्के क्षेत्रावर झालेली आहे.

हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक

बीडमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १६ हजार ३२० हेक्टर असताना प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन ११२.१४ टक्के म्हणजे १ लाख २० हजर ४४१ क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. जालना जिल्ह्यातील सर्वसाधारण ५२ हजार ८६६ क्षेत्राच्या तुलनेत ३७ हजार ५८५ हेक्टरवर तर जालना जिल्ह्यात सर्वसाधारण ६७ हजार ६५५ हेक्टर क्षेत्राचे तुलनेत ५२ हजार ७५४ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली.

Rabi Sowing
Rabi Sowing : मोहोळमध्ये गहू, हरभरा, कांदा, ज्वारीचा २३ हजार हेक्टरवर पेरा

लातूर जिल्ह्यातील हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ४७५ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख २८ हजार ७३४ हेक्टर वर हरभऱ्याची पेरणी झाली. धाराशिव जिल्ह्यात १ लाख ८० हजार ९६० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६५ हजार ५९४ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली.

नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ५३ हजार ३७० क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ७६ हजार ९६५ हेक्टरवर, परभणी जिल्ह्यात १ लाख १२ हजार १७० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख २७ हजार १६९ हेक्टर क्षेत्रावर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख २० हजार १४७ हेक्टर क्षेत्रच्या तुलनेत १ लाख २७ हजार ३८२ क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. लातूर विभागात धाराशिव वगळता सर्वच जिल्ह्यात हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे.

लातूर विभागातील पाच जिल्ह्यांतील पीक स्थिती (स्रोत कृषी विभाग)

रब्बी ज्वारी

पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७१८५७ हेक्टर असून आतापर्यंत २७७५९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ७४.६५ आहे. पीक सध्या उगवण ते रोप अवस्थेत आहे. पिकावर अल्प प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

गहू

पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १५६५१९ हेक्टर असून आतापर्यंत ८८१२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ५६.३० टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

हरभरा

पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७८६१२४ हेक्टर असून आतापर्यंत ८२५८४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १०५.०५ टक्के आहे. पीक सध्या उगवणी ते रोप अवस्थेत आहे.

करडई

पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर असून आतापर्यंत १९३८५ हेक्टरवर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ९९.२५ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या ते रोप अवस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com