Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : यवतमाळमध्ये वाढणार रब्बी क्षेत्र

Rabi Sowing : यंदा रब्बी हंगामाचे नियोजन कृषी विभागाने सुरू केले आहे. जवळपास दोन लाख हेक्टरवर हरभरा, गहू, ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा रब्बी हंगामाचे नियोजन कृषी विभागाने सुरू केले आहे. जवळपास दोन लाख हेक्टरवर हरभरा, गहू, ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा राहणार आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अतिरिक्त कोसळलेल्या पावसामुळे छोट्या-मोठ्या धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. परिणामी, रब्बी हंगामात अपेक्षितपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. गेल्यावर्षी दोन लाख सहा हजार ७१० हेक्टरवर रब्बी हंगामाची लागवड झाली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या जलसाठा चांगला असला तरी वाढलेले तापमान पाहता पाण्याची अडचण काही ठिकाणी उदभविण्याची शक्यता आहे. उपलब्ध जलसाठ्याचा अंदाज पाहता शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन सुरू आहे.

यंदा हरभरा एक लाख ४५ हजार हेक्टर, गहू ४५ हजार, ज्वारी दोन हजार ५००, तर मका एक हजार दोनशे, इतर १२ हजार ८५० हेक्टर पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. यासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन केले जात आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातून ते भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

सरासरी एक लाख हेक्टरवर हरभऱ्याचे क्षेत्र

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार रब्बी हंगामाची लागवड झाली. या तीन वर्षांत सरासरी एक लाख हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड झाली आहे. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर हरभरा लावला जाईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यासाठी लागणारे बियाणे, खतांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT