Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : मराठवाड्यात रब्बी क्षेत्र निम्म्यावर

Rabi Season : मराठवाड्यात सर्वसाधारण २१ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ १० लाख ९५ हजार हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात सर्वसाधारण २१ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ १० लाख ९५ हजार हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. कोणत्याही पिकांची सर्वसाधारण क्षेत्र इतकी पेरणी झाली नाही. सरासरीच्या तुलनेत अल्प व त्यातही अनेक प्रदीर्घ खंड पडून पडलेला पाऊस यामुळे जमिनीत न राहिलेली ओल मराठवाड्यातील रब्बीच्या पेरणी क्षेत्रावर परिणाम करून गेली आहे.

यंदा मराठवाड्यात रब्बीची सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख ५ हजार १११ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले होते. प्रस्तावित करण्यात आलेल्या या क्षेत्रापैकी केवळ १० लाख ९५ हजार ९१६ हेक्टरवरच आजवर रब्बीची पेरणी होऊ शकली.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण ७ लाख ४१ हजार ११८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेल्या ३ लाख ७ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेल्या ७ लाख ८८ हजार ३३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४१.५४ टक्केच रब्बी पेरणी झाली. तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५७.७८ टक्केच रब्बीची पेरणी झाली आहे.

खरिपात पावसाच्या दग्यामुळे मोठे नुकसान झाले. आता रब्बीवरही सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मोठे संकट घेऊन येऊ पाहत आहे. शेतकरी आपल्या परीने पेरलेल्या पिकाचं संगोपन करण्याचा प्रयत्न करीत असले तरी पाणी हातचे नसल्याने रब्बी पिकांचा जीवही धोक्यातच असल्याची स्थिती आहे.

तीन जिल्ह्यात ७५ टक्के; पाच जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस

छत्रपती संभाजी नगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड या तीन जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६४६.५३ मिलीमीटर इतकी आहे. ३१ ऑक्टोबर अखेर या तीनही जिल्ह्यात सरासरी ४८९.९७ मिलिमीटर पाऊस झाला. जो वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये ७५.७८ टक्के इतकाच आहे.

दुसरीकडे लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ८१३.३८ मिलिमीटर इतकी असून ऑक्टोबर अखेरपर्यंत ६२९.५० मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या केवळ ७७ टक्केच पाऊस झाला आहे. झालेल्या पावसादरम्यानही प्रत्येक जिल्ह्यात तीन ते सहा पर्यंत पावसाचे प्रदीर्घ खंड भागनिहाय पडले होते.

लातूर जिल्हा अपवाद

पाचही जिल्ह्यातील क्षेत्र ऊस पिक धरून आहे. त्यामुळे लातूर जिल्हा याला अपवाद ठरला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०२ टक्के ऊस पिकासह पेरणी झाल्याचे कृषी विभागाचा पेरणी अहवाल सांगतो.

जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष रब्बी पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी

छ. संभाजीनगर १९०९३५ ४०५८८ २२.२६

जालना २१७८९२ ७२०९४.२५ ३३.०९

बीड ३३२३५३ १९५२०१ ५८.७३

लातूर २८०४३९ २८६९०२ १०२

धाराशिव ४१११७२ १२५९२७ ३१

नांदेड २२४६३४ ११९५३८ ५३

परभणी २७०७९४ १६८०३१ ६२

हिंगोली १७६८९१ ८७६३७ ५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT