Rabi Sowing : अकोला जिल्ह्यात रब्बीची लागवड संथगतीने

Rabi Season : आधीच कमी पाऊस, त्यात परतीच्या पावसानेही दगा दिल्याने यंदाच्या रब्बी लागवडीवर मोठा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

Akola News : आधीच कमी पाऊस, त्यात परतीच्या पावसानेही दगा दिल्याने यंदाच्या रब्बी लागवडीवर मोठा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. जमिनीत ओल नसल्याने कोरडवाहू पट्ट्यातील लागवडीला ब्रेक बसला तर सिंचनाची सोय असलेल्या भागात आता पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २० टक्क्यांपर्यंत लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

रब्बी हंगामाच्या दृष्टीने यंदा पोषक वातावरण मिळालेले नाही. परतीचा पाऊस नसल्याने अधिक अडचण तयार झाली आहे. जिल्ह्याचे या हंगामात १ लाख ४७ हजार ५३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, परिस्थिती लक्षात घेता लागवड क्षेत्रात घट होऊ शकते.

या वर्षी हरभरा एक लाख हेक्टर, तर गहू २० हजार हेक्टरपर्यंत लागवड राहू शकते. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने गव्हाची लागवड घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गव्हाचे कमी होणारे क्षेत्र हे हरभऱ्यामध्ये परावर्तित होईल.

Rabi Sowing
Rabi Sowing : रानं तयार झाली, पण ओलच नाही..!

या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत लागवड आटोपल्याचे कृषी विभागातर्फे माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने हरभऱ्याची १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली. गव्हाची २ हजार हेक्टरवर लागवड झाली. दररोज लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याने ही आकडेवारी बदलत आहे.

रब्बीच्या पेरणीने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. काटेपूर्णाचे आवर्तन सुरू असून लाभक्षेत्रात पाणी पोहोचलेल्या भागात दर दिवसाला पेरणी वाढत आहे. वान प्रकल्पावरूनही रब्बीसाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

या दोन प्रकल्पांवरून जिल्ह्यात रब्बीची बऱ्यापैकी लागवड होत आहे. इतर छोट्या प्रकल्पांचाही थोडा आधार होत आहे. काही भागात विहिरींवरून सिंचन सुरू असून वीजपुरवठ्याचा प्रश्‍न डोकेदुखी झालेला आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचा ६० टक्के पेरा

लागवड घटण्याची शक्यता

रब्बीसाठी पोषक परिस्थिती नसल्याने यंदाच्या हंगामात नियोजित क्षेत्र साध्य होण्याची चिन्हे फारच कमी आहेत. रब्बी लागवड कमी होण्यासाठी परतीच्या पावसाचा अडथळा आलेला आहे. शिवाय सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने गव्हाची लागवडही घटू शकते.

अकोल्याचे प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

हरभरा १ लाख २० हजार

गहू २० हजार

मका ५ हजार

रब्बी ज्वारी २ हजार

करडई २५०

सूर्यफूल १०

मोहरी १००

तीळ १०

इतर पिके १५० हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com