Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बीची ५३ टक्के पेरणी

Rabi Season : सातारा जिल्ह्यात मागील पंधवराड्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाच्या ओलीवर रब्बी पेरणीस वेग आला आहे.
सातारा जिल्ह्यात रब्बीची 53 टक्के क्षेत्रावर पेरणी
सातारा जिल्ह्यात रब्बीची 53 टक्के क्षेत्रावर पेरणीAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात मागील पंधवराड्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाच्या ओलीवर रब्बी पेरणीस वेग आला आहे. बुधवारअखेर (ता. ४) ५३.११ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १३ हजार २४४ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख १३ हजार २५१ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ५३.११ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्‍यात सर्वाधिक २६ हजार ८६५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात रब्बीची 53 टक्के क्षेत्रावर पेरणी
Rain Update : खानदेशात हलका पाऊस

रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३५ हजार ५३१ हेक्‍टर असून, त्यापैकी ८८ हजार ५२० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. थंडीत सुरू झाल्याने हरभरा, गहू पिकांच्या पेरणी सुरू होऊ लागली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २७ हजार ७५३ हेक्‍टर असून, त्यापैकी ७ हजार ९५३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गहू पिकाचे ३७ हजार ३७४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, गव्हाची आठ हजार ४६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार २०९ हेक्‍टर असून, सात हजार ६३९ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामावर भिस्त आहे. दुष्काळी तालुक्यात शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

सातारा जिल्ह्यात रब्बीची 53 टक्के क्षेत्रावर पेरणी
Rabi Crop Insurance : रब्बी पिकांचे ९६ हजारांवर विमा प्रस्ताव

या दृष्टीने चारा व्हावा यासाठी रब्बी ज्वारी व मका करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. चाऱ्यांच्या संभाव्य धोका ओळखून मुरघासास प्राधान्य राहणार आहे.

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्‍टर) :

सातारा - ११,११६, जावली - ३,०७२, पाटण - १२,४५९, कऱ्हाड - ३,०७२, कोरेगाव - १२,८७८, खटाव -१९,४८३, माण-२६,८६५, फलटण - १२,२१०, खंडाळा - ५,३५२, वाई - ६,५९१, महाबळेश्वर - ५९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com