Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : कमी पावसामुळे रब्बी हंगामावर टांगती तलवार

Low Rainfall : यंदाच्या मोसमात कमी पाऊस झाल्याने आगामी रब्बी हंगामावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Akola News : यंदाच्या मोसमात कमी पाऊस झाल्याने आगामी रब्बी हंगामावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने नियोजित लागवड क्षेत्राबाबत यंत्रणास्तरावरही आता साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

या महिनाभरात परतीचा काही पाऊस झाला तर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहू शकतो असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांत जून ते सप्टेंबर या काळात सरासरीएवढाही पाऊस झालेला नाही.

मागील काही वर्षात रब्बी लागवडीवर शेतकरी जोर देत आहेत. खरिपात होणारे नुकसान या हंगामाच्या आधारे काही अंशी भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो. त्यामुळे या तिनही जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सुमारे साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक राहते. नेहमी सरासरीपर्यंत लागवड होत आलेली आहे.

यंदाच्या खरिपातही सोयाबीन या प्रमुख पिकाचे नुकसान झाल्याने रब्बीतून हा तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी नियोजन करीत आहेत. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला ही अडचण ठरू शकते.

ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांना सरंक्षित पाणी देऊन रब्बी साधताही येईल. या भागात रब्बीत बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू स्वरूपाचे आहे. यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यातच अद्याप ओलांडली गेलेली नाही. पुढील काळात येणारा पाऊस रब्बीसाठी दिलासा देणारा असेल.

जून ते सप्टेंबर दरम्यान झालेला पाऊस

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष झालेला पाऊस टक्के

अकोला ६९३.७ ५०३.७ ७२.६

बुलडाणा ६५९ ५७६ ८७.४

वाशीम ७८९ ६७०.८ ८५.००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT