Rabi Season : रब्बीसाठी २८ हजार क्विंटल बियाण्यांची सांगलीत मागणी

Seed Demand : गेल्या चार दिवसांत पावसाने हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगाम हाताला लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon

Sangli News : यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात सरासरीच्या ६८.७ टक्के पाऊस झाला, ३१.३ टक्के कमी नोंदला गेला. गेल्या चार दिवसांत पावसाने हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगाम हाताला लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी विभागाने रब्बीची तयारी सुरू केली असून २८ हजार ४८५ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. आता शेकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अवघा ३३ मिलिमीटर पाऊस झाला होता, त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ११२ मिमी पाऊस झाला. या महिन्यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला.

Rabi Seed
Fodder Seed : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा बियाणे कधी मिळणार

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पासाचा आधार शेतकऱ्याला मिळाला आहे. जिल्ह्यात सप्टेंबरअखेर सामान्यपणे ५१४.५ मिमी पाऊस होण्याची अपेक्षा असते. परंतु यंदाच्या हंगामात सप्टेंबरअखेर ३५३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या ६८.७ टक्के पाऊस झाला, म्हणजे यंदा ३२.३ टक्के कमी झाला.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्व तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी रब्बीतील पेरणीची तयारी करू लागला आहे. रब्बीच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने २८ हजार ४८५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून २१७९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. २१७९ पैकी १६३९ क्विंटल बियाणे विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Rabi Seed
Seed Supply : गुजरातच्या कंपन्यांचा बियाणे पुरवठा रोखण्याचा इशारा

रब्बीसाठी बियाण्यांची मागणी

पीक बियाणे (क्विंटलमध्ये)

ज्वारी ४९७३

गहू १००४५

मका ३१५०

हरभरा १०१३६

करडई १२६

सूर्यफूल ७५

कांदा १६

एकूण २८४८५

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर झालेला पाऊस

महिना सरासरी पाऊस (मिमी) झालेला पाऊस (मिमी) टक्केवारी

जून १२९.० ३५.७ २७.७

जुलै १३५.५ १७२.१ १२७

ऑगस्ट १११.४ ३३.३ २९.९

सप्टेंबर १३८.६ ११२.४ ८१.१

एकूण ५१४.५ ३५३.५ ६८.७

जिल्ह्यात १ लाख ९० हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातात. पंधरवड्यानंतर पेरण्या सुरू होतील. सध्याच्या पावसावर पेरण्या होतील आणि थंडीवर पिके पोसावतील. शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य व मार्गदर्शन कृषी विभाग करत आहे.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com