Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाची ओरड

Rabi Season : रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून पीककर्ज वितरणास मात्र प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Amaravati News : रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून पीककर्ज वितरणास मात्र प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे. या हंगामात ५०० कोटी रुपयांचे लक्षांक असताना आतापर्यंत किती वितरण झाले याची माहिती अग्रणी बॅंकेकडे नाही.

निवडणुकीच्या धुमश्चक्रीत या मुद्द्याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह सहकार विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वगळता राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बॅंका पीककर्ज वितरण करीत असते. या वर्षी पीककर्जाचे ५०० कोटी रुपयांचे लक्षांक निश्चित असून एक ऑक्टोबरपासून वितरणास प्रारंभ करण्याचे आदेश आहेत.

मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही किती शेतकऱ्यांनी पीककर्ज वितरित करण्यात आले याची माहिती अग्रणी बॅंकेकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

त्याचबरोबर सहकार विभागालाही यासंदर्भात माहिती पुरवण्यात आली नसल्याचे जिल्हा उपनिबंधकांकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यांचे या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय पक्ष व शेतकरी नेते निवडणुकीत व्यग्र आहेत.

त्यामुळे या मुद्द्यावर बोलण्यास कोणालाच वेळ नाही. अशा स्थितीत शेतकरी मात्र वाऱ्यावर सुटला आहे. रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून हरभरा पेरणी सुरू झाली आहे. ७४ हजार ७६० शेतकऱ्यांसाठी ५०० कोटी रुपयांचे लक्षांक जिल्हा समितीने निश्चित करून दिले आहे. त्याचे वितरण मात्र थंडावले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

SCROLL FOR NEXT